Header Ads

वाशिम, दि.०४ - रोजगार व स्वयंरोजगाराच्या उपलब्धतेसाठी होणार ‘मोबाईल ॲप’ची मदत - mobile app will help in getting self employment

रोजगार व स्वयंरोजगाराच्या उपलब्धतेसाठी होणार ‘मोबाईल ॲप’ची मदत

मोबाईल दुरूस्ती, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, मोटार मॅकेनिकल, वाहन, इलेक्ट्रीशियन, दुचाकी मॅकेनिक, फिटर, सुतार, प्लंबर, पत्रक धातू कामगार, वेल्डर, वायरमन, ऑरगॅनिक ग्रोव्हर, अकाउंट असिस्टंट, युजींग टॅली इत्यादी क्षेत्राचा या ॲपमध्ये समावेश 

वाशिम, दि. ०४ (जिमाका) : विविध कौशल्याचे प्रशिक्षण घेतलेले सुशीक्षित बेरोजगार, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वा खाजगी प्रशिक्षण संस्थेतून विविध प्रशिक्षण घेतलेले उमेदवार यांना स्थानिक स्तरावर रोजगार व स्वयंरोजगार सहजपणे उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गर्शन केंद्र वाशिम यांनी तयार केलेल्या ‘मोबाईल ॲप’ची मदत होणार आहे.

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार स्थानिक नागरीक यांना ऐकमेकांशी या ‘ॲप’च्या माध्यमातून तात्काळ संपर्क साधून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याकरीता मदत होईल. या ‘ॲप’मध्ये मोबाईल दुरूस्ती, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, मोटार मॅकेनिकल, वाहन, इलेक्ट्रीशियन, दुचाकी मॅकेनिक, फिटर, सुतार, प्लंबर, पत्रक धातू कामगार, वेल्डर, वायरमन, ऑरगॅनिक ग्रोव्हर, अकाउंट असिस्टंट, युजींग टॅली इत्यादी क्षेत्राचा या ॲपमध्ये समावेश करण्यात येणार आहे.

या क्षेत्राअंतर्गत प्रशिक्षितांना घरोघरी जावून आपल्या कुशल सेवा ‘ऑन कॉल’ उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. तरी अशा प्रकारच्या सेवा देवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी  ९६६५५२५६५१ या क्रमांकावर संपर्क साधून ‘ॲप’ची लिंक प्राप्त करून घ्यावी. तसेच या लिंकवर आपली नि:शुल्क नोंदणी करावी. प्रशिक्षित उमेदवार वा या क्षेत्रामध्ये वर्षानुवर्ष काम करण्याचा अनुभव असणारे उमेदवार वा व्यक्ती सुध्दा आपल्या नावाची नोंदणी या लिंकचा वापर करुन करु शकतात.

नोंदणी केलेल्या उमेदवारांना त्यांचे कौशल्याचे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र तसेच त्यांचे अनुभवाचे प्रमाणपत्र तपासणीकरीता कार्यालयात यथावकाश बोलविण्यात येईल. नोंदणीसाठी काही अडचणी निर्माण झाल्यास ०७२५२-२३१४९४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.