कारंजा दि. २८ - कारंजा येथील तरुण पत्रकार चरण राठोड यांचा कोरोनामुळे मृत्यू - Young journalist Charan Rathore dies due to corona

 कारंजा येथील तरुण पत्रकार चरण राठोड यांचा कोरोनामुळे मृत्यू 

पत्रकार जगतासह संपूर्ण समाजमनावर कोसळले दु:खाचे डोंगर 

कारंजा (जनता परिषद) दि.२८ - स्थानीक वृत्तवाहिनी के न्यूज चे पत्रकार, निवेदक, टेक्नीशियन आदी विविध भूमीका अत्यंत यशस्वीपणे सांभाळणारे सदैव हसतमुख असणारे चरण राठोड यांचे कोरोनामुळे आज सकाळी ७.३० वाजता निधन झाले. युवा पत्रकार मित्राच्या अशा अवेळी जाण्याने  पत्रकार बांधव परिवारावर तसेच मित्रपरिवारासह संपूर्ण कारंजा शहरावर एकच शोककळा पसरली. 

सुरुवातीला काही दिवस कारंजा येथे उपचार घेतल्यावर तब्बेत जास्त खालावल्याने वाशिम येथील रुग्णालयात त्यांचेवर उपचार केले जात होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 

वृत्तसंकलन करतांना खरे ते मांडून, कोणत्याही प्रकारची भिती न बाळगता, कर्तव्यनिष्ठता व प्रामाणिकतेने पत्रकार म्हणून भूमीका त्यांनी नेहमी पार पाडली. के न्यूज ह्या स्थानीक वृत्तवाहिनीचे अनेकदा निवेदक म्हणूनही त्यांनी आपल्या संवाद कौशल्यतेने प्रेक्षकांना आपलेसे केले होते. कारंजा केबल नेटवर्कचे संपुर्ण टेक्नीकल कार्यही अत्यंत चोखपणे चरण राठोड यांनी सांभाळले होते. 

    ईश्‍वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो हिच या प्रसंगी जनता परिषद परिवाराचे वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.  
Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३ वर्ष - ४४ दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२ Janta Parishad E-43 Y-44 24-11-2022

  साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३     वर्ष - ४४    दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२    Weekly Janta Parishad    Edition : 43      Year : 44     Date...