कारंजा दि २५ - भगवान श्री महावीर जयंती दिनी भ.महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती कारंजा ने समोर ठेवीला एक आदर्श - ideal example set by B Mahavir Janm Kalyanak Mahotsav Samiti karanja भगवान श्री महावीर जयंती दिनी भ.महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती कारंजा ने समोर ठेवीला एक आदर्श 

कोरोनाचे या संकटकाळी शासकीय रुग्णालय कारंजाला ऑक्सीजन मशीन ची दिली भेंट 

कारंजा (जनता परिषद) दि.२५ - आज जगाला अहिंसेचा संदेश देणारे व मानवतेच्या भल्याचे पथ प्रदर्शन करणारे भगवान महावीर यांची जयंती. ही जयंती कारंजाचे भ.महावीर जन्म कल्याणक महोत्सव समितीने एका वेगळ्याच प्रकारे साजरा करुन एक आदर्श निर्माण केला आहे. 

आज संपुर्ण देश कोरोनाच्या भयावह रुपाने त्रस्त आहे. अत्यावश्यक औषधीं, बेड, व्हेंटीलेटर सह जीवनाचा आधार असलेले ऑक्सीजन चा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अशात आज अनावश्यक खर्च न करता स्थानीक शासकीय रुग्णालय येथे एक ऑक्सीजन मशीन जी कोरोनाचे या काळात रुग्णांसाठी अत्यावश्यक आहे ती भेट रुपात देण्याचे महोत्सव समितीने निश्‍चित केले. या मशीनची बुकिंगही करण्यात आली असून मशीन ४ मे पर्यंत उपलब्ध होणार आहे. या मशीनसाठीचा खर्च जवळपास बाहत्तर हजार रुपये (७२,०००/-) इतका लागला आहे. 

भ.महावीर कल्याणक महोत्सव समिती कारंजा ने केलेल्या या कार्याचे कारंजेकरांमध्ये कौतूक होत असून भगवान महावीर यांची शिकवण ही मुर्त रुपात साकार करीत एक आदर्श निर्माण केला आहे. त्यावरही जयंती दिनी अनावश्यक खर्च न करता देश व संपूर्ण मानव समाज जेव्हा संकटात सापडतो तेव्हा व्यक्ती, संस्था, संघटना यांनी काय करावे ह्यावर अत्यंत उपयुक्त असे कृतीशिल मार्गदर्शनही  या उदाहरणाद्वारे केले आहे. 

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३ वर्ष - ४४ दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२ Janta Parishad E-43 Y-44 24-11-2022

  साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३     वर्ष - ४४    दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२    Weekly Janta Parishad    Edition : 43      Year : 44     Date...