Header Ads

कारंजा दि १४-०४-२०२१ - वंचित बहुजन आघाडीच्या वतिने डॉ.आंबेडकर यांची जयंती साजरी - vba dr babasaheb ambedkar jayanti news

वंचित बहुजन आघाडीच्या वतिने डॉ.आंबेडकर यांची जयंती साजरी

कारंजा दि.14 - वंचित बहुजन आघाडी कारंजा शहर व तालुका कार्यकारीणी च्या वतिने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दि.14 एप्रिल रोजी वेळ दुपारी 2 वाजता वंचित बहूजन आघाडी कार्यालय महाजन हाईड येथे साजरी करण्यात आली.

यावेळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून पुजन करण्यात आले त्यानंतर त्यांच्या महान कर्तृत्वावर प्रकाश टाकण्यात आला यावेळी कोरोनाचा प्रार्दूभाव असल्याने कार्यक्रम जमाव बंदी आदेशाचे पालन करून अतीशय शिस्तबध्द पध्दतीने पार पडला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव सिद्धार्थ देवरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.राजु आडे, ता.निरीक्षक भारत भगत, शहराध्यक्ष सचिन खांडेकर, ता.महासचिव देवानंद कांबळे, शहर उपाध्यक्ष विलास डोंगरे, सुमेध भगत. या कार्यकर्त्यांची उपस्थिति होती.

No comments

Powered by Blogger.