Header Ads

कारंजा दि १४-०४-२०२१ - विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका- संघटित व्हा -संघर्ष करा हा मूलमंत्र दिला - विलास राऊत - prp dr babasaheb ambedkar jayanti news

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी  शिका- संघटित व्हा -संघर्ष करा हा मूलमंत्र दिला - विलास राऊत

कारंजा दि.१४ - आज बुधवार दि.१४ एप्रिल २०२१ रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टी, प्रगत मित्र मंडळ कारंजा तालुक्याच्या वतीने अशोक नगर कारंजा(लाड) जि. वाशीम येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्व प्रथम पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख, कारंजा तालुकाध्यक्ष तथा साप्ताहिक कारंजा मेट्रोचे संपादक विलास राऊत, प्रगत मित्र मंडळ तथा साप्ताहिक प्रगत कारंजाचे संपादक विजय गागरे, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते गवळी 

समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष चांदभाई मुन्नीवाले यांनी बोधिसत्व तथागत भगवान गौतम बुद्ध,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्ती लावून, पुष्पहार अर्पण केले व त्यांना वंदन केले तसेच उपस्थितांनीसुद्धा तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन केले व शुभेच्छा दिल्या.

 या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुकाध्यक्ष राऊत यांनी सांगितले की विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मूलमंत्र दिला शिका-संघटित व्हा -संघर्ष करा हा  संदेश दिला व याचे सर्वांनी अनुकरण करून केले तरच आपण सर्व सामान्य जनतेला न्याय मिळून देणे शक्य होईल,तसेच  तथागत गौतम बुद्धानी प्रज्ञा - शील - करूणा,पंचशीलाचा जो संदेश दिला त्याचा प्रचार प्रसार करून त्यांचे चार तळागाळापर्यंत पोहोचवावे असे मनोगत व्यक्त केले. 

No comments

Powered by Blogger.