Header Ads

कारंजा दि १४-०४-२०२१ - कारंजा पत्रकार मंच कार्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह संपन्न - patrakar manch dr babasaheb ambedkar jayanti news

कारंजा पत्रकार मंच कार्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह संपन्न 

कारंजा दि १४ - स्थानिक कारंजा पत्रकार मंच कार्यालयात, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद वाशिम तथा कारंजा पत्रकार मंचातर्फे, बुधवार रोजी सकाळी, विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह, कारंजा पत्रकार मंचाचे अध्यक्ष : दिलीप पाटील रोकडे तथा, प्रमुख उपस्थितीमध्ये, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष, संजय कडोळे, निलेश काळे, विलास राऊत ,श्याम सवाई, चाँद मुन्नीवाले, मोहम्मद मुन्नीवाले, विजय गागरे, उमेश अनासाने यांचे उपस्थितीत संपन्न झाला.

    यावेळी सर्वप्रथम अध्यक्ष दिलीप रोकडे तथा मान्यवरांचे हस्ते, डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला हारार्पण व अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी, संजय कडोळे यांनी कारंजा पत्रकार मंच कार्यालयाला, "मुकनायक वृत्तपत्राचे आद्य संपादक, विश्वरत्न डॉ  बाबासाहेबांची प्रतिमा भेट दिली. 

    याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विलास राऊत यांनी, बाबासाहेबांचा शिका, संघटीत व्हा, न्यायहक्कासाठी संघर्ष करा ! हा मूलमंत्र सांगीतला . संजय कडोळे यांनी  "घटनेचे शिल्पकार, संविधा नाचे जनक, मुकनायक पत्रकारी तेचे संपादक, डॉ बाबासाहेबांची जयंती घराघरात साजरी होऊन आपण त्यांचे जीवनचरीत्र लक्षात घेऊन आचरणात आणणे आवश्यक असल्याचे सांगीतले . " अध्यक्षीय भाषणातून बोलतांना दिलीप पाटील रोकडे म्हणाले, विश्वरत्न डॉ बाबासाहेबांची १३० वी जयंती आज संपूर्ण विश्वात साजरी होत असतांना, कारंजा येथील महाराष्ट्र साप्ताहिक पत्रकार परिषद तथा कारंजा पत्रकार मंचातर्फे साजरी होत असल्याचा मला स्वाभिमान असून, सामाजिक समते करीता त्यांनी लिहीलेल्या संविधानाबद्दल त्यांना अभिवादन करण्याचा, आजचा मंगलमय दिन आहे. 

सामाजिक अंतर ठेऊन, मास्क, सॅनिटायझर्स चा वापर करीत कार्यक्रम शासन निर्देशानुसार साजरा करण्यात आला.   यावेळी कार्यक्रमाला सुनिल फुलारी, किरण क्षार, आरेफ भाई पोपटे, महेंद् गुप्ता , समिर देशपांडे आदीची उपस्थिती होती . 

    कार्यक्रमाचे संचालन श्याम सवाई, प्रास्ताविक संजय कडोळे तथा समारोपिय संभाषण मोहम्मद मुन्नीवाले यांनी केले.     

    

No comments

Powered by Blogger.