Header Ads

वाशिम दि १० एप्रिल २०२१ - कोरोना चाचणी समन्वयासाठी जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत पथक गठीत - team for corona test coordination

कोरोना चाचणी समन्वयासाठी पथक गठीत

वाशिम, दि. १० (जिमाका) : कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. या चाचण्यांचे प्रयोगशाळेतून प्राप्त झाल्यानंतर संबंधित तालुकास्तरीय यंत्रणा व रुग्णालयांना उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पथक गठीत करण्यात आले आहे. कोरोना चाचण्यांच्या अनुषंगाने समन्वय ठेवण्याचे काम हे पथक करणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

नवीन नियमावलीनुसार परवानगी दिलेल्या दुकाने, आस्थापनामधील कमर्चारी, कामगार यांची प्रत्येक १५ दिवसाला कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. या व्यावसायिकांच्या कोरोना चाचणीचे अहवाल संबंधित तालुक्याच्या व्यापारी संघटनांमार्फत संबंधितांना पोहोचविणे, व्यापारी वर्ग वगळता इतर सर्वसामान्य व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल संबंधित तहसील कार्यालयास पाठविणे यासोबतच कोविड रुग्णालयांमध्ये कोरोना चाचणीसाठी शासकीय चमू दररोज भेट देतो किंवा नाही, याची तपासणी करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी या पथकावर देण्यात आली आहे. नायब तहसीलदार सुनील देशमुख, कनिष्ठ लिपिक दत्ता धनगर, संतोष बैरवार, अजय बांडे यांचा या पथकात समावेश आहे.

No comments

Powered by Blogger.