Header Ads

दि ०९ एप्रिल २०२१ - अखिल भारतीय सफाई कर्मचारी कल्याण संघ (ट्रेड यूनियन) - कारंजाचे सुरज देवीदास सारवान यांची प्रदेश महामंत्री म्हणून नियूक्ती - suraj dividas sarwan karanja

अखिल भारतीय सफाई कर्मचारी कल्याण संघ (ट्रेड यूनियन)

कारंजाचे सुरज देवीदास सारवान यांची प्रदेश महामंत्री म्हणून नियूक्ती 

कारंजा (प्रति.) दि.०९ - सफाई कर्मचार्‍यांच्या हक्कासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारी एक राष्ट्रस्तरीय ट्रेेड यूनियन संघटना म्हणून अखिल भारतीय सफाई कर्मचारी कल्याण संघ (ट्रेड यूनियन) कार्यरत आहे. 

या अखिल भारतीय सफाई कर्मचारी कल्याण संघ (ट्रेड यूनियन) चे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीत कारंजा येथील सुरज देवीदास सारवान यांची प्रदेश महामंत्री म्हणून नियूक्ती करण्यात आली आहे. या बाबतचे एक नियुक्तीपत्र अखिल भारतीय सफाई कर्मचारी कल्याण संघ चे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद जावडेकर यांनी काल दिनांक ८ एप्रील रोजी  दिले. 

सुरज सारवान यांचे कार्यांना पाहून सफाई कर्मचार्‍यांच्या समस्या सोडविण्याचे दृष्टीने व त्यांना न्याय मिळवून संघटन मजबूत करण्याचे उद्देशाने त्यांना हे पदभार देण्यात आले आहे. 

या नियुक्तीवर वाल्मीकी सेना कारंजा व समस्त वाल्मीकी समाज बांधवांनी सुरज देवीदास सारवान यांचे अभिनंदन केले आहे. 

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.