Header Ads

वाशिम दि २१ - वाशिम जिल्ह्यात प्राणवायूचा साठा उपलब्ध - sufficient oxygen supply in washim district

वाशिम जिल्ह्यात प्राणवायूचा साठा उपलब्ध

वाशिम दि २१ - जिल्ह्यात सद्यस्थितीत ८ ड्युरा सिलेंडर व १२९ जम्बो सिलेंडर असा एकूण ३.५७ मेट्रिक टन प्राणवायूचा साठा उपलब्ध आहे.

सध्या प्रति तासाला जास्तीत जास्त ०.२६ मेट्रिक टन प्राणवायूची गरज भासते, सध्या उपलब्ध असलेला प्राणवायू साठा पुढील १४ तास उपयोगात येईल. तत्पूर्वी उद्या सकाळपर्यंत आणखी २०० जम्बो सिलेंडर, ६ ते ८ ड्युरा सिलेंडर प्राप्त होणार आहेत.

जिल्ह्यात शासकीय व खाजगी रुग्णालयांना दररोज सुमारे ६ मेट्रिक टन प्राणवायूची गरज भासते, प्राणवायूची ही गरज नियमितपणे पूर्ण होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्राणवायूचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाचे वतीने देण्यात आली आहे.  

No comments

Powered by Blogger.