Header Ads

दि. २३ एप्रिल २०२१ - वाशिम तालुक्यातील झाकलवाडी येथील बाल विवाह रोखला say no to child marriage


 वाशिम तालुक्यातील झाकलवाडी येथील बाल विवाह रोखला

वाशिम, दि. २३ (जिमाका) : वाशिम तालुक्यातील झाकलवाडी येथील अल्पवयीन बालीकेचा २४ एप्रिल रोजी होणारा बालविवाह रोखण्यात महिला व बाल कल्याण विभागाला यश आले. झाकलवाडी येथे बालविवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड लाईनकडून महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, वाशिम येथील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांना मिळताच त्यांनी बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी भगवान ढोले, कायदा तथा परिविक्षा अधिकारी जिनसाजी चौधरी, तालुका संरक्षण अधिकारी बंडू धनगर यांना बाल विवाह रोखण्याचे आदेश दिले.

बालिकेच्या कुटूंबाला बालविवाह न करण्याबाबत व त्याच्या दुष्परीणामाबाबत समुपदेशन करण्यात आले. त्यांच्याकडून बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत पालकाकडून हमीपत्र लिहून घेण्यात आले. मुलाला व मुलीला त्यांच्या पालकासोबत बाल कल्याण समिती, वाशिम यांच्या समोर उपस्थित राहण्याबाबत सांगण्यात आले.

यावेळी पोलीस काँस्टेबल नंदकुमार सरनाईक, उज्ज्वला गवई, अंगणवाडी सेविका नंदा अंभोरे, आशा वर्कर बेबी काकडे, चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक महेश राऊत, अश्विनी बर्डे, सुनिता सरनाईक, अविनाश चौधरी आदी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हयात बालविवाह होणार असल्याचे आढळून आल्यास चाईल्ड लाईनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, वाशिम यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.