Header Ads

दि. २३ एप्रिल २०२१ - शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व निविष्ठा विक्रेत्यांसाठी जिल्हा व तालुकास्तरावर कृषी निविष्ठा सनियंत्रण कक्ष स्थापन agro control room in washim district and tahsil

 

शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व निविष्ठा विक्रेत्यांसाठी जिल्हा व तालुकास्तरावर कृषी निविष्ठा सनियंत्रण कक्ष स्थापन

वाशिम, दि. २३ (जिमाका) : जिल्ह्यातील शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आणि कृषी निविष्ठा विक्रेत्यांना खरीप हंगाम २०२१ मध्ये बियाणे, खते व किटकनाशकाबाबत येणाऱ्या अडचणी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने जाहिर केलेल्या निर्बंधाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या  वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनाने जे निर्बंध लागू केले आहे. त्यामुळे बियाणे, खते व किटकनाशके यांचे उत्पादन, प्रक्रीया , वाहतूक वितरण व विक्री करतांना अडचणी निर्माण होवू शकतात. निर्माण झालेल्या परिस्थितीत सदर निविष्ठाचा काळा बाजार व साठेबाजी रोखण्यासाठी त्यांचे उत्पादन, वितरण व विक्री नियंत्रित करण्याचे काम या संनियंत्रण कक्षामार्फत केले जाणार आहे.

जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण कक्ष पुढील प्रमाणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कृषी उपसंचालक एन.आर. ठोंबरे (भ्रमणध्वनी क्र. ९४२१९३६६९१), कृषी सहायक डी.पी. आरु (भ्रमणध्वनी क्र. ९४०४२५२६७९), जिल्हा परिषदेच्या कृषी विभगाचे मोहिम अधिकारी सी. पी. भागडे (भ्रमणध्वनी क्र. ८८०५८१०५१८), ग्राम विकास अधिकारी एस. के. इंगळे (भ्रमणध्वनी क्र. ९७६३२०२२८५), उपविभागीय स्तरावरील कृषी निविष्ठा सनियंत्रण कक्ष तंत्र अधिकारी श्री. पल्लेवाड (भ्रमणध्वनी क्र. ७७४४८२२००१), श्रीमती धांडे (भ्रमणध्वनी क्र. ९४२०१२४९५४), वाशिम तालुका कृषी अधिकारी अनिल कंकाळ (भ्रमणध्वनी क्र. ९४२३१२८६२६), कृषी सहायक श्री. तक्रस (भ्रमणध्वनी क्र. ७५८८७९३६१७, पंचायत समितीचे कृषी अधिकारी आर. पी. भद्रोड (भ्रमणध्वनी क्र. ९९७५७०११५५), विस्तार अधिकारी ए. एस. मुळे (भ्रमणध्वनी क्र. ९७६३७३५३४६), मालेगांव तालुका-  तालुका कृषी अधिकारी शशीकिरण जांभरुनकर (भ्रमणध्वनी क्र. ९४०५९६६९६६), कृषी सहायक श्री. मानवतकर (भ्रमणध्वनी क्र. ९९२२२८४८५४), कृषी अधिकारी एस.एल. अवचार (भ्रमणध्वनी क्र. ९८२२७६३९०५), विस्तार अधिकारी बी. एन. ठाकरे (भ्रमणध्वनी क्र. ९६८९६६०५०९), रिसोड तालुका- तालुका कृषी अधिकारी श्रीमती घोलप (भ्रमणध्वनी क्र. ९४०५९६६९६६), कृषी अधिकारी श्री. मानवतकर (भ्रमणध्वनी क्र. ९९२२२८४८५४), कृषी अधिकारी आर. एन. जोशी (भ्रमणध्वनी क्र. ७८७५५८४२४३), पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्रीमती गावंडे (भ्रमणध्वनी क्र. ९७६६४९६३०५), मंगरुळपीर तालुका- तालुका कृषी अधिकारी रविंद्र इंगोले (भ्रमणध्वनी क्र. ९४०४०९३९८६), कृषी अधिकारी अशोक इंगोले (भ्रमणध्वनी क्र. ९४२०३५३३०९), पंचायत समितीचे कृषी अधिकारी पी. एस. शेळके (भ्रमणध्वनी क्र. ९२८४५६६३०९), विस्तार अधिकारी आर. बी. वाडणकर (भ्रमणध्वनी क्र. ७५८८०९०४५०), मानोरा तालुका- तालुका कृषी अधिकारी के. डी.  सोनटक्के (भ्रमणध्वनी क्र. ९४०४३३८२१६), कृषी पर्यवेक्षक एस. एन. मनवर (भ्रमणध्वनी क्र. ९३२९११८९३८), पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी. एस. मकासरे (भ्रमणध्वनी क्र. ९९२१४७३९५५), विस्तार अधिकारी (भ्रमणध्वनी क्र. ९०११५५५३९४, कारंजा तालुका- तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके (भ्रमणध्वनी क्र. ९४२२९२१०९०), कृषी अधिकारी प्रमानंद राऊत (भ्रमणध्वनी क्र. ९४८४९२४०८०), पंचायत समिती कारंजाचे कृषी अधिकारी पी. एस. देशमुख (भ्रमणध्वनी क्र. ७५८८७६३४२७), विस्तार अधिकारी एस. व्ही. कोल्हे (भ्रमणध्वनी क्र. ९८८१९४८२२५) यांचा या सनियंत्रण कक्षात समावेश आहे.

बियाणे, खते व किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठयाच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणीचे वा तक्रारीचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षांशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजता दरम्यान संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचेशी संपर्क साधावा. तक्रार नोंदवायची असल्यास adozpwashim@gmail.com  या ईमेलवर सुध्दा तक्रार नोंदविता येईल, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विकास बंडगर यांनी कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.