Vardhapan Din

Vardhapan Din

दि.२३ एप्रिल २०२१ - विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांची स्त्री रुग्णालयातील ऑक्सिाजन निर्मिती प्रकल्पाला भेट amravati division commissioner visited washim


विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांची स्त्री रुग्णालयातील ऑक्सिाजन निर्मिती प्रकल्पाला भेट

वाशिम, दि. २३ (जिमाका) :  विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी आज, २३ एप्रिल रोजी जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालय(लेडी हार्डिंग) परिसरात उभारण्यात येत असलेल्या ऑक्‍सिजन निर्मिती प्रकल्पाला भेट दिली. यावेळी  जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी सुनील विंचनकर व संदीप महाजन यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालय येथे कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये ५० आयसीयु बेड आणि १५० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये आणखी ७५ बेडची वाढ येत्या दोन दिवसात करण्यात येणार आहे. उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांसाठी ऑक्सिजनची व्यवस्था व्हावी, यासाठी स्त्री रुग्णालय परिसरात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची उभारणी सुरु आहेत. या प्रकल्पातून दर मिनिटाला २०० लिटर ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. जिल्ह्यात आणखी दोन ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी यावेळी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या प्रगतीबाबतची माहिती संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून  घेतली. तसेच येत्या दोन दिवसात प्रकल्प कार्यान्वित करण्याचे निर्देश श्री. सिंह यांनी संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना  दिले.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

Janta Borewells

Janta Borewells
Janta Borewells