Vardhapan Din

Vardhapan Din

वाशिम दि १० एप्रिल २०२१ - रेमडेसिवीर इंजेक्शनच्या नियमित पुरवठ्यासाठी प्रयत्न सुरु - अन्न व औषध प्रशासन विभागाची माहिती regular supply of remdesivir inj soon


रेमडेसिवीर इंजेक्शनच्या नियमित पुरवठ्यासाठी प्रयत्न सुरु
अन्न व औषध प्रशासन विभागाची माहिती


वाशिम, दि. १० (जिमाका) : कोविड-१९ उपचारासाठी प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा जिल्ह्यात नियमित राहण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न सुरु आहेत. सध्या रेमडेसिवीर इंजेक्शन जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांच्या मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त वि. द. सुलोचने यांनी दिली आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी सही, शिक्क्यानिशी चिट्टी अनिवार्य आहे, तसेच रुग्णाचा आरटी-पीसीआर चाचणीचा पॉझिटिव्ह अहवाल, रुग्णाचे आधार कार्ड, खरेदीसाठी येणाऱ्या व्यक्तीचे फोटो ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेसाठी प्रशासनामार्फत दैनंदिन आढावा घेण्यात येत असून इंजेक्शनचा तुटवडा होवू नये, यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

जिल्ह्यात वाशिम येथील पल्स कोविड हॉस्पिटल येथील महेश मेडिकोज, बिबेकर हॉस्पिटल येथील सहयोग मेडिकल, देवळे हॉस्पिटल येथील लक्ष्मी मेडिकल, लाईफ लाईन हॉस्पिटल येथील लाईफ लाईन मेडिकल, बाहेती हॉस्पिटल येथील माँ गंगा मेडिकल स्टोअर्स, रेनॉल्ड हॉस्पिटल, प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र आणि रिसोड येथील सिटी केअर हॉस्पिटल येथील सिटी केअर मेडिकलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहे. इंजेक्शनच्या उपलब्धतेविषयी काही अडचणी असल्यास वाशिम जिल्ह्यासाठी औषध निरीक्षक हे. य. मेतकर (भ्रमणध्वनी क्र. ९७३०१५५३७०) यांच्याशी संपर्क साधावा, असे श्री. सुलोचने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

Janta Borewells

Janta Borewells
Janta Borewells