Vardhapan Din

Vardhapan Din

वाशिम दि. २० एप्रिल २०२१ - ‘ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट’ च्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी। Oxygen generation plant in washim district


 
‘ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट’ च्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

  • दोन ते तीन दिवसात ऑक्सिजन प्लान्ट होणार कार्यान्वित
  • दर मिनिटाला २०० लिटर ऑक्सिजनची होणार निर्मिती
  • जिल्ह्यात आणखी दोन ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट उभारण्यात येणार

वाशिम, दि. २० (जिमाका) : स्त्री रुग्णालय येथील जिल्हा कोविड रुग्णालय परिसरात ‘ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट’ची उभारणी करण्यात येत असून या प्लान्टचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, २० एप्रिल रोजी जिल्हा कोविड रुग्णालयाला भेट देवून प्लान्ट उभारणीच्या कामाचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश मडावी, डॉ. राजेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट’ची उभारणी पूर्ण झाल्यानंतर दर मिनिटाला २०० लिटर ऑक्सिजनची निर्मिती होणार असून या प्लान्टमध्ये तयार होणारा ऑक्सिजन सेन्ट्रल लाईनद्वारे रुग्णांच्या बेडपर्यंत पोहोचविला जाणार आहे. या प्लान्टचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या दोन ते तीन दिवसांत प्लान्ट कार्यान्वित होवून प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मिती सुरु होणार आहे, अशी माहिती डॉ. राठोड यांनी यावेळी दिली.

जिल्ह्यात आणखी दोन ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट उभारण्यात येणार

वाशिम येथील जिल्हा कोविड रुग्णालय परिसरात दर मिनिटाला २०० लिटर ऑक्सिजन निर्मिती क्षमता असलेल्या ‘ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट’ची उभारणी अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत वाशिम येथील जिल्हा कोविड रुग्णालय व कारंजा येथील कोविड हेल्थ सेंटर परिसरात दर मिनिटाला ६०० लिटर ऑक्सिजन निर्मिती क्षमता असलेले ‘ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट’ उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिली. तसेच या दोन्ही प्लान्टची उभारणी सुद्धा लवकरात लवकर होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

Janta Borewells

Janta Borewells
Janta Borewells