Header Ads

दि ३० एप्रिल २०२१ - मालेगाव येथील कोविड केअर सेंटरसाठी ना. ना. मुंदडा विद्यालयाची इमारत अधिग्रहित n n mundada school acquired for covid care center

मालेगाव येथील कोविड केअर सेंटरसाठी ना. ना. मुंदडा विद्यालयाची इमारत अधिग्रहित

वाशिम, दि. ३० (जिमाका) : मालेगाव शहरातील अकोला फाटा येथील ना. ना. मुंदडा विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाची इमारत कोविड केअर सेंटरसाठी अधिग्रहित करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, ३० एप्रिल रोजी निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार मालेगाव येथील ना. ना. मुंदडा विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाची इमारत अधिग्रहित करून याठिकाणी कोविड केअर सेंटरला मान्यता देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.