Header Ads

कारंजा दि.30 - कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे यांचे सर्व खाजगी डॉक्टरांना निर्देश - directions to private doctors by tahsildar dhiraj manjre

खाजगी दवाखान्यांमध्ये भरती असलेले व तपासणीस येणार्‍या कोरोना सदृश्य  रुग्णांना RTPCR / रॅपीड अँटीजन टेस्ट करण्याच्या सुचना डॉक्टरांनी द्याव्यात 

कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे यांचे सर्व खाजगी डॉक्टरांना निर्देश 

    कारंजा दि.३० - कारंजा तालुक्यातील सर्व खाजगी दवाखान्यांमध्ये भरती असलेल्या तसेच उपचारार्थ, तपासणीस येणार्‍या कोरोना सदृश्य रुग्णांना  कोरोना रोगाची तपासणी करणेकरीता RTPCR / रॅपीड अँटीजन टेस्ट संबंधीत डॉक्टरांनी आपले स्तरावरुन सुचीत करावे असे निर्देश कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे यांनी आजरोजी एका पत्राद्वारे दिले आहे. 

कारंजा तालुक्यामध्ये कोरोना संसर्ग बाधीत असलेले रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रोगाला थोपविणेसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासन व शासन हे करीतच आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बरेचशे कोरोना सदृश्य असलेले रुग्ण उपचार घेत असल्याचे दिसून येते आहे. ही बाब ्रअतिशय गंभीर असून ह्यामुळे कोरोना संसर्ग होऊन त्याचा प्रसार झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. 

त्याअनुषंगाने रुग्णालयात उपचारा करीता येत असलेल्या कोरोना सदृश्य रुग्णांना RTPCR / रॅपीड अँटीजन टेस्ट तपासणी करीता ह्या डॉक्टरांनी सुचीत करावे जेणे करुन ह्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे सोपे होईल व संसर्गात आळा बसेल. तसेच ह्या तपासणीस प्रथम प्राधान्य द्यावे, असे देखील ह्यामध्ये निर्देशीत करण्यात आलेले आहे. 

No comments

Powered by Blogger.