वाशिम दि. ०२/०४/२०२१ - शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज १५ एप्रिलपर्यंत MahaDBT ‘महाडीबीटी’ पोर्टलवर सादर करा Submit applications for scholarships on the MahaDBT portal

शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज १५ एप्रिलपर्यंत MahaDBT  ‘महाडीबीटी’ पोर्टलवर सादर करा 

वाशिमचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांचे आवाहन

वाशिम, दि. ०२ (जिमाका) : सन २०१८-१९ पासून महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी https://mahadbtmahait.gov.in हे पोर्टल माहिती व तंत्रज्ञाना यांच्यातर्फे कार्यरत करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता अनुसूचित जाती, विजाभज, इमाव आणि विमाप्र या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन झालेल्या योजनांकरिता नवीन प्रवेशित व नूतनीकरणाचे विद्यार्थ्यांचे अर्ज https://mahadbtmahait.gov.in पोर्टलवर १५ एप्रिल २०२१ पर्यंत भरून घ्यावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी जिल्ह्यातील सर्व प्राचार्य यांना केले आहे.

सन २०२०-२१ मधील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे व इतर योजनांचे अर्ज https://mahadbtmahait.gov.in यासंकेतस्थळावर भरण्याची अंतिम मुदत १५ एप्रिल आहे. पोर्टलवर सन २०२०-२१ मधील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांच्या अर्जांची कमी नोंदणी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्राचार्य यांनी आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना या योजनांचे अर्ज १५ एप्रिल पर्यंत भरण्यासाठी आपल्या स्तरावरून आवाहन करावे.

 नोटीस विभागामध्ये देण्यात आलेल्या कालावधीनुसार भरून घ्यावे. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलला फार कमी प्रमाणात नोंदणी झाल्याचे दिसून येत आहे. तरी जिल्ह्यातील सर्व प्राचार्य यांनी आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना या योजनांचे अर्ज भरण्यासाठी आपल्या स्तरावरून आवाहन करावे. तसेच सन २०१९-२० मधील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांच्या बाकी राहिलेल्या अर्जांवर दिलेल्या वेळेत तत्काळ कार्यवाही करून घ्यावी.

जिल्ह्यातील सर्व प्राचार्य यांनी सर्व संबंधित पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्याबाबत अवगत करावे. तसेच https://dbtworkflow.mahaonline.gov.in या पडताळणी संकेतस्थळावर देण्यात आलेल्या कालावधीनुसार संबंधित महाविद्यालयांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन झालेल्या योजनांसाठी प्राप्त झालेले अर्ज शासन निर्णयानुसार पडताळणी करून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज संकेतस्थळावर दिलेल्या कालावधीमध्ये सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, वाशिम यांच्याकडे ऑनलाईन पाठवावेत. तसेच पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती व इतर योजनांपासून वंचित राहिल्यास आणि अशा विद्यार्थ्यांकडून फी वसूल केल्यास संबंधित महाविद्यालया विरुद्ध शासन निर्णयानुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३ वर्ष - ४४ दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२ Janta Parishad E-43 Y-44 24-11-2022

  साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३     वर्ष - ४४    दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२    Weekly Janta Parishad    Edition : 43      Year : 44     Date...