Header Ads

वाशिम दि ०२/०४/२०२१ - खाजगी क्षेत्रातील आस्थापना प्रमुखांनी रिक्त पदे अधिसूचित करावीत - Appeal to Heads of private sector establishments to notify vacancies

खाजगी क्षेत्रातील आस्थापना प्रमुखांनी रिक्त पदे अधिसूचित करावीत 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांचे आवाहन

वाशिम, दि. ०२ (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून जिल्ह्यातील नोकरी इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी १० एप्रिल व १७ एप्रिल दरम्यान www.rojgar.mahaswayam.gov या वेबपोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी वाशिम जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील खाजगी क्षेत्रातील नियोक्ता, आस्थापना प्रमुख यांनी त्यांच्या आस्थापनांवर आवश्यक असणारे मनुष्यबळ पुर्तीकारिता मागणीपत्र ७ एप्रिल २०२१ पूर्वी सादर करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी केले आहे.

मागणी पत्रात पदाचे नाव व पदसंख्या, शैक्षणिक अथवा तांत्रिक पात्रता, वयोमर्यादा व मानधन इत्यादी बाबींचा अंतर्भाव असावा. तरी ज्या खाजगी आस्थापनांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावयाचे आहे, त्यांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या ०७२५२-२३१४९४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून  washimrojgar@gmail.com या ई-मेलवर मागणीपत्र ७ एप्रिल पूर्वी सादर करावे, असे आवाहन श्रीमती बजाज यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.