Header Ads

मालेगाव तालुक्यातील कोरोना लसीकरण केंद्रांना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांची भेट

मालेगाव तालुक्यातील कोरोना लसीकरण केंद्रांना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांची भेट

 शेलगाव बोंदाडे येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

वाशिम, दि. ०३ (जिमाका) : मालेगाव तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, ३ एप्रिल रोजी शहरी व ग्रामीण भागातील विविध लसीकरण केंद्रांची पाहणी केली. तसेच लसीकरण मोहीम गतिमान करण्याच्या सूचना केल्या.

यावेळी मालेगावचे तहसीलदार रवी काळे, गट विकास अधिकारी श्री. पद्मावार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी मालेगाव ग्रामीण रुग्णालय, करंजी उपकेंद्र यासह ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांची पाहणी केली. तसेच शेलगाव बोंदाडे येथील प्रतिबंधित क्षेत्राला भेट देऊन तेथील कोरोना प्रतिबंधक उपाययोजना अंमलबजावणी विषयी माहिती घेतली.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक आहे. लसीकरण मोहिमेला गती देण्याची आवश्यकता असून शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत लसीकरणाची माहिती पोहचविण्यासाठी प्रयत्न करावा. याकरीता आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांची पथके स्थापन करून घरोघरी जाऊन लसीकरण मोहिमेविषयी जनजागृती करावी. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींची कोरोना चाचणी व कोरोना प्रतिबंधक लसीकरण लवकर पूर्ण करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.