Header Ads

दि. २९ - वाशिम जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्र सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा krushi seva Kendra timings

 

वाशिम जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्र सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा

प्राप्त परिस्थितीत बांधावर निविष्ठा वाटप, ई-कॉमर्सद्वारे (ऑनलाईन) विक्रीस परवानगी 

वाशिम, दि. २९ (जिमाका) : आगामी खरीप हंगाम लक्षात घेवून जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्र, त्याच्याशी निगडीत उत्पादन व वाहतूक सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, २९ एप्रिल रोजी निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र, त्याच्याशी निगडीत उत्पादन व वाहतूक सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहील. तसेच प्राप्त परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर निविष्ठा वाटप, ई-कॉमर्सद्वारे (ऑनलाईन) विक्री इत्यादी पध्दतीने कमीत कमी संपर्कात शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्ध करून देण्याकरिता परवानगी देण्यात आली आहे

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.