दि. १० मार्च - सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय राहणार सुरु washim rto news
सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय राहणार सुरुनवीन वाहन नोंदणीसाठी सुविधा
वाशिम, दि. १० (जिमाका) : सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता असल्याने त्यामुळे नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून ग्राहकांना वाहनाचा ताबा मिळावा, यासाठी मार्च महिन्यात सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुद्धा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये वाहन नोंदणी व कर वसुलीचे कामकाज सुरु राहणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञा. ए. हिरडे यांनी कळविले आहे.
मार्च महिन्यात ११ मार्च रोजी महाशिवरात्री, तसेच १३ व १४ मार्च, २० व २१ मार्च, २७ व २८ मार्च रोजी शनिवार व रविवार असल्याने सार्वजनिक सुट्टी व २९ मार्च रोजी धुलीवंदन असल्याने सार्वजनिक सुट्टी आहे. मात्र, या दिवशी सुद्धा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन नोंदणी व कर वसुलीचे कामकाज सुरु राहील, असे श्री. हिरडे यांनी कळविले आहे.
Post a Comment