Header Ads

वाशिम जिल्ह्यातील ई-फेरफार प्रमाणीकरणाची प्रलंबित ७६२ प्रकरणे विशेष मोहिमेद्वारे दोन दिवसांत निकाली washim district E-ferfar

वाशिम जिल्ह्यातील ई-फेरफार प्रमाणीकरणाची प्रलंबित ७६२ प्रकरणे विशेष मोहिमेद्वारे दोन दिवसांत निकाली

 महसूल प्रशासनाची कामगिरी

वाशिम, दि. ०७ (जिमाका) : विविध कारणांमुळे जिल्ह्यात सातबारा नोंदी, वारस लावणे, बोजा चढविणे अथवा कमी करणे यासह विविध नोंदी ई-फेरफार प्रणालीवर प्रमाणित करण्याची ११७७ प्रकरणे प्रलंबित होती. यापैकी ७६२ प्रकरणे दोन दिवसांत निकाली काढण्यात आली आहेत. याकरिता जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या सूचनेनुसार प्रत्येक तालुक्यात शनिवारी व रविवारी विशेष मोहीम आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती प्रभारी अपर जिल्हाधिकारी सुनील विंचनकर यांनी दिली.

जिल्ह्यात ई-फेरफार नोंदणीची ११७७ प्रकरणे विविध कारणांमुळे प्रलंबित होती. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी सदर प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना नुकत्याच झालेल्या राजस्व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत केल्या होत्या. त्यानुसार ६ व ७ मार्च रोजी सर्व तालुक्यांमध्ये ई-फेरफार प्रकरणे निकाली काढण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. संबंधित सर्व तहसीलदार व मंडळ अधिकारी यांनी सलग दोन दिवस या मोहिमेमध्ये कामकाज करून परिपूर्ण असलेली ७६२ प्रकरणे म्हणजेच ६५ टक्के प्रकरणे निकाली काढून ई-फेरफार प्रमाणित केले आहेत. उर्वरित ४१५ प्रकरणे त्रुटी व इतर कारणांमुळे प्रलंबित राहिली आहेत.

या मोहिमेमध्ये नोंदणीकृत ई-फेरफारची ३३७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये वाशिम तालुक्यातील ४९, कारंजा तालुक्यातील ६४, मानोरा तालुक्यातील ४१, रिसोड तालुक्यातील १०५, मंगरूळपीर तालुक्यातील ५९, मालेगाव तालुक्यातील १९ प्रकरणांचा समावेश आहे. तसेच निकाली निघालेल्या ४२५ अनोंदणीकृत ई-फेरफार प्रकरणांमध्ये वाशिम तालुक्यातील ५५, कारंजा तालुक्यातील ७४, मानोरा तालुक्यातील १२५, रिसोड तालुक्यातील ८२, मंगरूळपीर तालुक्यातील ४४, मालेगाव तालुक्यातील ४५ प्रकरणांचा समावेश आहे. प्रलंबित असलेल्या ई-फेरफार नोंदी प्रमाणित करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

1 comment:

  1. माननीय कलेक्टर साहेब
    आपने बहोत अच्छा काम किया है
    आपको बहोत बहोत धन्यवाद

    ReplyDelete

Powered by Blogger.