Header Ads

दि.७ मार्च २०२१ - वाशिम जिल्ह्यात १५ मार्चपर्यंत संचारबंदी कायम. DM order Timed Curfew in washim district up to 15 March

वाशिम  जिल्ह्यात १५ मार्चपर्यंत संचारबंदी कायम
दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार

वाशिम, दि. ०७ (जिमाका) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक क्षेत्राबाहेरील क्षेत्रात लागू करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशांना १५ मार्च २०२१ रोजीच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी आज, ७ मार्च रोजी जारी केले आहेत.

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात २१ फेब्रुवारीपासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशाला ८ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सद्यस्थितीत जिल्ह्यात अजूनही कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने १५ मार्चपर्यंत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ८ मार्चपर्यंत लागू असलेले सर्व आदेश, नियम तसेच दुकाने, आस्थापनांच्या वेळा १५ मार्चपर्यंत कायम राहणार आहेत. या आदेशाचे भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व अशा व्यक्ती, संस्था, संघटना, यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.