दि.१३ मार्च, वाशिम - 'होम आयसोलेशन’ नियम उल्लंघन प्रकरणी कारंजा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी कारवाई

 'होम आयसोलेशन’ नियम उल्लंघन प्रकरणी कारंजा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी कारवाई

भामदेवी येथील एका बाधितावर गुन्हा दाखल

वाशिम, दि. १३ (जिमाका) : जिल्ह्यातील कोरोना संसार्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत. तसेच होम आयसोलेशनमधील रुग्णांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेशही त्यांनी दिलीये आहेत. त्यानुसार कारंजा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी कारवाई करण्यात आली आहे. होम आयसोलेशन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भामदेवी येथील एका कोरोना बाधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी कामरगाव येथील एका बाधितावर अशीच कारवाई करण्यात आली.

कोरोना बाधितांना संसर्गाची कोणतीही लक्षणे नसल्यास व घरी राहण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असल्यास त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याची परवानगी देण्यात येते. मात्र, या बाधितांनी होम आयसोलेशनच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. त्यांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई असते. जिल्ह्यात होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या बाधितांकडून या नियमांचे पालन होत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समिती सोपविण्यात आली आहे, तर शहरी भागात यासाठी स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी सुद्धा गृहभेटी देवून याबाबतची माहिती घेतात.

भामदेवी येथे सुद्धा काही व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये राहत आहेत. या बाधितांकडून नियमांचे पालन होत आहे का, याबाबत ग्रामस्तरीय समितीमार्फत तपासणी केली जात असताना यापैकी एक व्यक्ती होम आयसोलेशनचे नियम मोडून घराबाहेर पडल्याचे समितीच्या निदर्शनास आले. त्यामुळे ग्रामस्तरीय समितीच्यावतीने ग्राम विकास अधिकारी यांनी सदर व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ग्रामस्तरीय समितीमार्फत जिल्ह्यात पहिलाच गुन्हा : कालिदास तापी

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या आदेशानुसार प्रत्येक गावामध्ये ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे, होम आयसोलेशनमधील कोरोना बाधितांकडून नियमांचे पालन होत असल्याची खात्री करणे, गावामध्ये कोरोना चाचण्या करण्यासाठी आरोग्य विभागाला मदत करण्याची जबाबदारी या समितीमार्फत पार पाडली जात. होम आयसोलेशनचे उल्लंघन करणाऱ्या भामदेवी येथील व्यक्तीवर समितीमार्फत गुन्हा दाखल करण्यात आला असून समितीमार्फत दाखल करण्यात आलेला जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा आहे, अशी माहिती कारंजा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी कालिदास तापी यांनी दिली.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३ वर्ष - ४४ दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२ Janta Parishad E-43 Y-44 24-11-2022

  साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३     वर्ष - ४४    दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२    Weekly Janta Parishad    Edition : 43      Year : 44     Date...