Header Ads

दि.१२ मार्च - रविवारीही सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा

वाशिम जिल्ह्यात रविवारीही सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा

वाशिम, दि. १२ (जिमाका) : कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशात अंशतः बदल करण्यात आला असून, आता रविवारी सुध्दा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व दुकाने, आस्थापना सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, १२ मार्च रोजी निर्गमित केले आहेत.

जिल्ह्यात २६ फेब्रुवारी रोजी लागू करण्यात आलेल्या आदेशानुसार प्रत्येक शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत डेअरी, दूध विक्री करणारी दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. या आदेशाला १५ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, मात्र आता या आदेशात बदल करून सर्व दुकाने, आस्थापना रविवारी सुद्धा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व दुकाने, आस्थापना सातही दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील.

No comments

Powered by Blogger.