Header Ads

०७ मार्च - वाशिम जिल्ह्यात आज २४२ कोरोना बाधित 07 March - Washim District Corona News

         

०७ मार्च - वाशिम जिल्ह्यात आज २४२ कोरोना बाधित  

07 March - Washim District Corona News

जिल्ह्यातील एकुण रुग्ण संख्या गेली दहा हजारावर

    वाशिम (जनता परिषद) दि.०७ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून २४२रुग्णांची नोंद झाली तर १४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्येने दहा हजार चा आकडा पार केला असुन संख्या १०,२२० वर पोहोचली आहे. 

वाशिम शहरातील सिंधी कॅम्प येथील १, पंचशील नगर येथील १, नालंदा नगर येथील १, अल्लाडा प्लॉट येथील २, विनायक नगर येथील २, सिव्हील लाईन्स येथील ११, देवपेठ येथील १, विवेकानंद नगर येथील १, गवळीपुरा येथील १, शिवाजी नगर येथील १, जुनी नगरपरिषद समोरील परिसरातील १, रामनगर येथील १, रिद्धी-सिद्धी कॉलनी परिसरातील १, आययुडीपी येथील २, योजना पार्क येथील १, नवीन आययुडीपी येथील ३, रमेश टॉकीज जवळील १, साखरा रोड येथील १, लाखी येथील १, वारा जहांगीर येथील १, अनसिंग येथील २, कुंभी येथील १, ब्रह्मा येथील २, तोरणाळा येथील २, 

मालेगाव शहरातील ७, राजुरा येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, 

मानोरा शहरातील २, म्हसनी येथील १, पोहरादेवी येथील १, साखरडोह येथील १, 

मंगरूळपीर शहरातील पंचशील नगर येथील १, मिलिंद नगर येथील १, सुपर कॉलनी येथील १, मंगलधाम येथील १, कल्पना नगर येथील १, चांदई येथील १, येडशी येथील १, पेडगाव येथील १, शेलूबाजार येथील २, रामसिंगवाडी येथील १, धोत्रा येथील १, गोलवाडी येथील ४, वार्डा फार्म येथील १, नवीन सोनखास येथील १, चिंचखेडा येथील २, कुंभी येथील ७, कोठारी येथील २, जांब येथील १, 

रिसोड शहरातील अग्रसेन नगर येथील १, बसस्थानक परिसरातील १, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील १, सदाशिव नगर येथील १, एकता नगर येथील १, बिबखेडा येथील १, केशवनगर येथील १, केनवड येथील १, चाकोली येथील १, असोला येथील १, गोभणी येथील २, पवारवाडी येथील १, मोप येथील १, 

कारंजा शहरातील वनदेवी नगर येथील १, विद्याभारती कॉलनी येथील १, कीर्ती नगर येथील १, सुदर्शन कॉलनी येथील १, मेन रोड परिसरातील १, मेमन कॉलनी येथील १, प्रशांतनगर येथील १, कॉटन मार्केट येथील १, चवरे लाईन येथील ६, संतोषी माता कॉलनी येथील २, तुळजा भवानी नगर येथील १, पोलीस वसाहत परिसरातील १, गौतम नगर येथील २, तुषार कॉलनी येथील २, बंजारा कॉलनी येथील १, जैन कॉलनी येथील १, पीएनसी कॅम्प येथील १, साईनगर येथील २, वाणीपुरा येथील १, पत्रकार कॉलनी येथील १, सहारा कॉलनी येथील ३, मोहन नगर येथील ३, जैन मंदिर जवळील १, सिद्धेश्वर कॉलनी येथील १, नगरपरिषद जवळील १, प्रभात टॉकीज जवळील ३, सिंधी कॅम्प येथील २, पहाडपुरा येथील १, गुरुदेव नगर येथील १, पोहा येथील ४, महागाव येथील २, आखतवाडा येथील १, वाल्हई येथील १, पसरणी येथील ६, धोत्रा जहांगीर येथील १०, धनज बु. येथील ७, भामदेवी येथील २, समृद्धी महामार्ग जवळील १, हिंगणवाडी येथील ३, शेमलाई येथील ४, भुलोडा येथील २, वापटा येथील १, सोहळ येथील ५, कामठवाडा येथील १, पिंप्री मोडक येथील २, उंबर्डा बाजार येथील १, खेर्डा येथील २, लाडेगाव येथील १, किन्ही रोकडे येथील १, नरेगाव येथील ३, मनभा येथील २, धोत्रा देशमुख येथील १, यावर्डी येथील १, दादगाव येथील ११, बेलमंडल येथील ७, दोनद येथील २, गणेशपूर येथील २, भिलखेडा येथील १, वढवी येथील १, घोटा येथील १, बेंबळा येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

जिल्ह्याबाहेरील ६ बाधितांची नोंद झाली असून १४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

दरम्यान, जिल्हा कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वाशिम येथील ५० वर्षीय व्यक्तीचा ६ मार्च रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – १०,२२०      
  • ऍक्टिव्ह – १४९७       
  • डिस्चार्ज – ८५५९       
  • मृत्यू – १६३ 

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.