Header Ads

फेब्रुवारी महिन्यातील धान्य वितरणात बदल Ration in Feb 2021 in Washim district

फेब्रुवारी महिन्यातील धान्य वितरणात बदल

वाशिम चे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील विंचनकर यांनी दिली माहिती

वाशिम, दि. ०२ : सद्यस्थितीत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत प्रति लाभार्थी ३ किलो गहू २ रुपये प्रति किलो दराने व २ किलो तांदूळ ३ रुपये प्रति किलो दराने तसेच अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकार्ड १५ किलो गहू २ रुपये प्रति किलो दराने व २० किलो तांदूळ ३ रुपये प्रति किलो दराने वितरीत करण्यात येत आहे. माहे फेब्रुवारी महिन्यात या वितरणात बदल करण्यात आला आहे.

फेब्रुवारी महिन्यात प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेच्या तसेच अंत्योदय योजनेच्या कार्डधारकांना गव्हाचे प्रमाण ५० टक्के कमी करून त्याठिकाणी ४० टक्के मका व १० टक्के ज्वारीचे वितरण करण्यात येईल. मका व ज्वारीचा विक्री दर प्रति किलो १ रुपया आहे. तसेच शेतकरी लाभार्थ्यांच्या वितरणात कोणताही बदल झालेला नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील विंचनकर यांनी कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.