Header Ads

‘बर्ड फ्ल्यू’ संसर्ग रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी - Guidelines issued to prevent bird flu infection


 
‘बर्ड फ्ल्यू’ संसर्ग रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जारी केली सूचना 

वाशिम, दि. ०३ : एव्हीयन इन्फ्लूएन्झा विषाणूचा अर्थात बर्ड फ्ल्यूचा संसर्ग रोखण्यासाठी हाती घ्यावयाच्या उपाय योजनां बाबत मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जारी केल्या आहेत.

वाशिम जिल्ह्यामध्ये स्थित ठिकाणी एखाद्या पक्षाला बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आल्यास ते ठिकाण ज्या गावात स्थित असेल, त्या गावाच्या शिवारात व गावास प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येते. अशा प्रतिबंधित क्षेत्रातून जिवंत अथवा मृत पक्षी बाहेर नेता येणार नाही. अशा पक्षांचे मांस, अंडी, खाद्य पोल्ट्री, मॅन्युर, लिट्टर, पक्षांची त्वचा, पक्षाचे मृत शरीर किंवा पक्षाचा कोणताही भाग, त्यासंबंधी कोणतीही वस्तू किंवा बाब प्रतिबंधित क्षेत्राबाहेर नेता येणार नाही. त्याची वाहतूक करता येणार नाही. प्रतिबंधित क्षेत्रात पक्षी एकत्र जमवता येणार नाहीत, त्यांचे प्रदर्शन भरविता येणार नाही.

लागण झालेल्या पक्षांना व त्या संपर्कातील पक्षांची शास्त्रोक्त पद्धतीने कलिंग करून विल्हेवाट लावण्यात यावी. या पक्षांची विल्हेवाट लावताना जमिनीमध्ये ५ फुट खड्डा खोडून त्यामध्ये चुना टाकावा, त्यानंतर पक्षाला टाकावे. त्यावर परत चुना टाकून खड्डा बुजविण्यात यावा. बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झालेल्या पक्षांना मार्केट, बाजार, सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रतिबंधित क्षेत्रात त्याला नेता येणार नाही. लागण झालेल्या पक्षांच्या वाहतुकीच्या आधी व नंतर सदर वाहनाची व जागेची जंतुनाशक फवारणी करून निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे.

No comments

Powered by Blogger.