Header Ads

‘लॉकडाऊन’च्या मार्गदर्शक सूचनांना २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ - Lockdown guidelines extended to 28 February

 ‘लॉकडाऊन’च्या मार्गदर्शक सूचनांना २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

वाशिमचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांचे आदेश 

वाशिम, दि. ०३ (जिमाका) : जिल्ह्यात १ ऑक्टोंबर २०२० पासून लॉकडाऊनच्या सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या २९ जानेवारी २०२१ च्या आदेशानुसार सदर मार्गदर्शक सूचना आता २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत लागू राहणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी १ फेब्रुवारी २०२१ रोजी निर्गमित केले आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध मा. मुख्य सचिव, महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र शासन यांचेकडील आदेश क्रमांक डीएमयु/२०२०/डीआयएसएम-१ दिनांक २९ जुलै २०२० मधील परिशिष्ट ३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० व भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ नुसार तसेच साथरोग अधिनियम १८९७ अन्वये दंडनीय तथा कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत..

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.