Header Ads

बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण - ज्योती ठाकरे Guidance to women in self help groups at Dhanora

बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण - ज्योती ठाकरे

धानोरा येथे बचतगटातील महिलांना मार्गदर्शन

वाशिम, दि. ०६ (जिमाका) : बचतगटांमुळे आज महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होवू लागल्या असून त्यांचे समाजातील स्थान उंचावण्यास मदत झाली असल्याचे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांनी सांगितले. धानोरा खुर्द येथील लोकसंचालित साधन केंद्राच्यावतीने ५ फेब्रुवारी रोजी आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्ष माया आटपडकर होत्या.

यावेळी मंगरूळपीर पंचायत समितीच्या सभापती दिपाली इंगोले, उषाताई सरनाईक, जिल्हा परिषद सदस्य सुनिता कोठाळे, श्रीमती डोफेकर, माविमचे विभागीय सनियंत्रण अधिकारी केशव पवार, आयसीआयसी बँकेचे विभागीय अधिकारी अमित शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपूरे, सहाय्यक समन्वय अधिकारी समीर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीमती ठाकरे म्हणाल्या, बचत महिलांचा गुण आहे. घरात कोणतीही वस्तू आणताना त्यामध्ये बचत कशी होईल, हे महिला पाहतात. बचतगटामुळे महिलांना आर्थिक पाठबळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

याठिकाणी बचत गटांनी लावलेल्या स्टॉलला श्रीमती ठाकरे यांनी भेट दिली, तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनेविषयी माहिती घेतली. या मेळाव्यात वरुड येथील ज्ञानेश्वरी महिला बचतगटाला ७ लक्ष ४९ हजार रुपये, नवीन सोनखास येथील अष्टभुजा महिला बचतगटाला ६ लक्ष २५ हजार रुपये, सखी महिला बचतगटाला ५ लक्ष ५२ हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. राधाकृष्ण महिला बचत गटाच्या कापड केद्रालाही श्रीमती ठाकरे यांनी भेट दिली. भरारी महिला  बचतगटामार्फत सुरु करण्यात आलेल्या दुध संकलन केंद्राचे उद्घाटनही श्रीमती ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी गटाच्या अध्यक्ष लता भगत व सर्व सदस्यांशी त्यांनी संवाद साधला. आभार प्रदर्शन लोकसंचालित साधन केद्राच्या व्यवस्थापक सिमा मनवर यांनी केले.

No comments

Powered by Blogger.