Header Ads

अनुकंपा तत्वावर पोलीस भरती झालेल्या उमेदवारांना ना. जयंत पाटील, ना. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान - appointment of candidates on compassionate basis

अनुकंपा तत्वावर पोलीस भरती झालेल्या उमेदवारांना ना. जयंत पाटील, ना. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

वाशिम, दि. ०६ (जिमाका) : राज्य शासनाने सरळ सेवा कोट्यातील सर्व पदांच्या बाबतीत गट क  व ड मधील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदाच्या २० टक्के पदे अनुकंपा नियुक्तीद्वारे भरण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार वाशिम जिल्हा पोलीस आस्थापनेवर २ उमेदवारांना पोलीस शिपाई पदावर नियुक्ती देण्यात आली. या उमेदवारांना आज, ६ फेब्रुवारी रोजी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार अॅड. किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. शासन निर्णयानुसार अशाप्रकारे अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याची कार्यवाही करणारे वाशिम पोलीस अधीक्षक कार्यालय हे राज्यातील पहिलेच पोलीस अधीक्षक कार्यालय असल्याचे पोलीस अधीक्षक श्री. परदेशी यांनी यावेळी सांगितले.

अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासंदर्भात राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यासाठी जिल्हा स्तरावर पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीने २ पदे अनुकंपा तत्वावर भरता येणार असल्याचे निश्चित केल्यानंतर ३१ डिसेंबर २०२० पासून भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली. शासन निर्णयातील तरतुदी तसेच अटी व शर्तीच्या अधीन राहून वाशिम येथील तेजस मोहनराव चौधरी आणि लोणार (जि. बुलडाणा) तालुक्यातील अंकुश जायभाये या दोघांना खुल्या प्रवर्गात नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांना आज जलसंपदा मंत्री ना. पाटील आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. शिंगणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

No comments

Powered by Blogger.