Header Ads

दि.२१ फेब्रु - कोरोना संसर्ग रोखणेसाठी सामाजिक अंतर, मास्क सह नियमांचे पालन करावे - कारंजाचे तहसीलदार धीरज मांजरे यांचे आवाहन


दुकान, आस्थापना, बैंक, रास्त धान्य दुकानदारांनी सामाजिक अंतर सह इतर नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून घ्यावी 

कोरोना संसर्ग रोखणेसाठी सामाजिक अंतर, मास्क सह नियमांचे पालन करावे 

 कारंजाचे तहसीलदार धीरज मांजरे यांचे आवाहन 

कारंजा दि.२१ - कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, कारंजा तालुक्यातील सर्व आस्थापना, दुकान व्यवस्थापक तसेच सरकारी तसेच खाजगी बँका तसेच रास्त धान्य दुकाने यांनी ग्राहकांना सेवा देतांना समााजिक अंतर (Social Distance) पाळण्याचे दृष्टीने सहा फुट अंतराने वर्तुळ आखणी करावी तसेच सर्व ग्राहकांना मास्क वापरणे बंधनकारक करावे असे आदेश कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे यांनी दिले आहे. 

नागरिकांनीही सामाजिक अंतर, मास्कचा वापर व सॅनिटायझर चा वापर करुन स्वत:ची, स्वत:चे परिवाराची पर्यायाने समाजाची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. सर्वच दुकानदार व प्रतिष्ठाण यांनी वेळ तसेच इतर नियमांच्या बंधनांचेही काटेकोरपणे पालन करुन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व स्वत: व आपले ग्राहकांचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

आजरोजी यासंदर्भात विविध नियम अमरावतीचे माननीय विभागीय आयुक्त व वाशिमचे माननीय जिल्हाधिकारी यांनी निर्गमीत केले आहे. त्या सर्वच नियमांचे तसेच वेळोवेळी शासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करुन प्रशासनास मदत करण्याचे आवाहन कारंजा वासीयांना तहसिलदार धिरज मांजरे यांनी केले आहे. 

No comments

Powered by Blogger.