Header Ads

कोरोना प्रसार रोखण्यासाठी अमरावती विभागीय आयुक्तांनी केले दिशानिर्देश जारी

कोरोना प्रसार रोखण्यासाठी अमरावती विभागीय आयुक्तांनी केले दिशानिर्देश जारी

अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशिम या पाचही  जिल्ह्यात लागु

आस्थापनांंची वेळ ०९.०० ते ०५.०० पर्यंत

हाँटेल, उपहारगृहांना केवळ पार्सलची मुभा 

अमरावती (जनता परिषद) दि. २१/०२/२०२१ - विभागाचे आयुक्त मा.श्री. पियुष जी सिंह यांनी आज अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांंसाठी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खालील दिशा निर्देश जारी केले आहेत. 

 सद्यस्थितीत अमरावती विभागात अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशीम या जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव खुप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे अमरावती विभागातील सर्व जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्याकरीता अमरावती विभागातील शहरी व ग्रामीण भागामध्ये प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करुन, सदर भागाच्या सीमा निश्चित करुन सदर क्षेत्रामध्ये (Containment Zone) प्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे. त्याबाबतचे स्वतंत्र निर्देश देण्यात येत आहेत.

अमरावती विभागातील कोरोनाचा प्रार्दुभाव झालेल्या शहरी व ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभाविपणे अंमलबजावणी करण्याकरीता प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित अमरावती विभागातील शहरी व ग्रामीण भागासाठी खालीलप्रमाणे सुधारित निर्देश देण्यात येत आहेत.

१. सर्व प्रकारची दुकाने/आस्थापना हया सकाळी ९.०० ते सायं. ५.०० वा. पर्यंत सुरु राहतील.

२. महानगरपालीका/नगर परिषदानगरपालीका क्षेत्रातील ज्या उदयोगांना सुरु ठेवण्याकरीता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे ते सर्व उद्योग सुरु ठेवण्याकरीता परवानगी राहील.

 ३. सर्व प्रकारचे शासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आरोग्य व वैद्यकीय, कोषागार, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, NIC, अन्न व नागरी पुरवठा, FCI, N.Y. K., महानगरपालीका बँका सेवा वगळून) हया १५% किंवा १५ व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राहय धरुन सुरु राहतील.

४. सर्व प्रकारच्या खाजगी कार्यालयातील आस्थापना हया एकूण १५ % किंवा कमीत कमी १५ कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राहय धरुन सुरु राहतील. 

५. ग्राहकांनी दुकानामध्ये खरेदी करण्याकरीता जवळपास असलेल्या बाजारपेठ, अतिपरिचित दुकानदार यांचा वापर करावा, शक्यतो दुरचा प्रवास करुन खरेदी करणे टाळावे. 

६. सर्व प्रकारची उपहारगृहे/हॉटेल्स प्रत्यक्ष सुरु न ठेवता फक्त पार्सल सुविधेस परवानगी राहील.

७. लग्नसमारंभाकरीता २५ व्यक्तींना (वधू व वरासह) परवानगी अनुजेय राहील.

८. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये (विदयापीठ, महाविद्यालये, शाळा) येथील अशैक्षणीक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई-माहिती, उत्तरपत्रीका तपासणे, निकाल घोषित करणे इ. कामाकरीता परवानगी अनुज्ञेय राहील.

९. मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरु राहील आणि वाहतूक साठी कुठल्याही प्रकारचे निबंध राहणार नाही. १०. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतुक करतांना चार चाकी गाडीमध्ये चालकाव्यतीरिक्त इतर ३ प्रवासी अनुज्ञेय राहतील. तीन चाकीगाडी (उदा. ऑटो) मध्ये चालकाव्यतीरिक्त दोन प्रवासी, दुचाकीवर हेलमेट व मास्क सह २ प्रवासी यांना परवानगी राहील.

११. आंतर जिल्हा बस वाहतूक करतांना बस मधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या ५०% प्रवाशी सह सोशल डिस्टंसिंग व निर्जतुकीकरण करुन वाहतूकीकरीता परवानगी अनुज्ञेय राहील. याकरीता विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, अमरावती यांनी नियोजन करावे. 

१२. सर्व धार्मिक स्थळे ही एकावेळी १० व्यक्तीपर्यंत मर्यादील स्वरूपात नागरिकांसाठी सुरु राहतील. 

१३. ठोक भाजीमंडई सकाळी ३.०० ते ६.०० या कालावधीत सुरु राहील. परंतु सदर मंडईमध्ये किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहील.

१४. संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे. खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस, हे बंद राहतील.

१५. संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाटयगृहे. प्रेक्षकगृहे, व इतर संबंधित ठिकाणे ही बंद राहतील.

१६. संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन है या कालावधीत बंद राहतील.

No comments

Powered by Blogger.