Header Ads

श्रीक्षेत्र रामनाथ महाराज योगी मठात माघी गुप्त नवरात्रोत्सव निमीत्त गोंधळ जागरण


श्रीक्षेत्र रामनाथ महाराज योगी मठात माघी गुप्त नवरात्रोत्सव निमीत्त गोंधळ जागरण

कारंजा (लाड) दि.२५ - येथून जवळच असलेल्या रामगाव (रामेश्वर ) येथील, विध्यांचल पर्वतरांगेतील, उत्तर वाहिनी, अडाणनदी किनारी, रम्य अशा निसर्ग स्थानी,सातशे आठशे वर्षापूर्वी च्या, शिवालयात, श्री रामनाथ महाराज ( श्री रामापूर योगी मठ, .येथे, विधीपूर्वक माघी नवरात्रोत्सव संपन्न झाला. 

सदरहु कार्यक्रम केवळ महाराजांचे शिष्य मंडळाचे उपस्थितीतच संपन्न झाला. त्यानिमित्ताने, मठाधिपती, डॉ . अभेदनाथजी गुरु सेवानाथजी यांचे आदेशानुसार, दशमी तिथीचे औचित्य साधून, डॉ. अभेद्नाथजी महाराज यांचे उपस्थितीत, आई श्री अन्नपूर्णा माता मंदिरात, अखिल विश्वात सुख समृद्धी नांदावी .आणि संपूर्ण विश्वातील महाभयंकर जंतुसदृश्य रोगराई नष्ट व्हावी. या करीता, आई श्री अन्नपूर्णा चरणी, कारंजा येथील, जय भवानी जय मल्हार गोंधळी कला संच कारंजाचे लोकप्रिय कलावंत तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त गोंधळी संजय कडोळे यांचा, "आदिशक्तिचा - जागर - गोंधळ " कार्यक्रम संपन्न झाला 

यावेळी, श्री. मार्तंडनाथ स्वामी गुरु अभेदनाथजी ; श्री . नर्मदा नाथजी गुरु अभेदनाथजी, ह.भ.प किन्हीकर महाराज उपस्थित होते. यावेळी गोधळी कलावंत कमलेश कडोळे, टाळकरी उमेश अनासाने यांनी साथ संगत दिली .

No comments

Powered by Blogger.