Header Ads

दि.25 फेब्रुवारी - वाशिम जिल्ह्यात दूध, रेस्टॉरंट मधील खाद्य पदार्थ घरपोच वितरणाच्या वेळेत बदल


वाशिम जिल्ह्यात दूध, रेस्टॉरंट मधील खाद्य पदार्थ घरपोच वितरणाच्या वेळेत बदल

वाशिम, दि. २५ : जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्राबाहेर दुधाचे व रेस्टॉरंटमधील खाद्य पदार्थांचे घरपोच वितरण करण्यास आता सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत व सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा राहणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, २५ फेब्रुवारी रोजी काढले आहेत.

२१ फेब्रुवारीच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्राबाहेरील  सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. यामध्ये अंशतः बदल करून जिल्ह्यात दुधाचे व रेस्टॉरंटमधील खाद्य पदार्थांचे घरपोच वितरण करण्यास आता सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत व सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.