Vardhapan Din

Vardhapan Din

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भरपगारी सुट्टी - सरकारी कामगार अधिकारी

ग्रामपंचायत निवडणुक - मतदार असलेल्या सर्व कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानासाठी भरपगारी  सुट्टी द्यावी

सरकारी कामगार अधिकारी, वाशिम यांचे आदेश 

वाशिम, दि. १४ : जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात मतदार असलेल्या सर्व कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदानादिवशी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. सदर कामगार, अधिकारी, कर्मचारी हे कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर असले तरी त्यांना त्यांना सुट्टी देण्यात यावी, असे सरकारी कामगार अधिकारी यांनी कळविले आहे.

सदर सुट्टी खाजगी कंपन्यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृह, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स यासारख्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र, त्याबाबत त्यांनी संबंधित मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींचे मालकांनी, व्यवस्थापनाने या सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत मतदारांकडून तक्रार आल्यास योग्य कारवाई करण्यात येईल, असे सरकारी कामगार अधिकारी, वाशिम यांनी कळविले आहे.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

Janta Borewells

Janta Borewells
Janta Borewells