Header Ads

कोरोना विषाणू प्रतिबंधक लस वाशिम जिल्ह्यात दाखल

कोरोना विषाणू प्रतिबंधक लस वाशिम जिल्ह्यात दाखल 
६५०० डोसची खेप पोहोचली

वाशिम, दि. १४ : कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करणाऱ्या कोविशिल्ड लसीचे ६५०० डोस बुधवारी रात्री उशिरा जिल्ह्यात दाखल झाले. लस वाहतूक करणारे वाहन अकोला येथून जिल्हा परिषदेच्या शीतसाखळी भांडारगृह येथे आल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी नारळ फोडून वाहनाचे स्वागत केले.

पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या फ्रंट लाईन वर्कर्सना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. १६ जानेवारी रोजी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होणार असून पहिल्या दिवशी वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय आणि मंगरूळपीर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी १०० लाभार्थ्यांना लसीकरण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी यावेळी दिली.

No comments

Powered by Blogger.