Header Ads

14 Jan - Washim District Corona News - वाशिम जिल्ह्यात आज १७ कोरोना बाधित

  

    

  14 Jan - Washim District Corona News

१४ जाने. - वाशिम जिल्ह्यात आज १७ कोरोना बाधित  

    वाशिम (जनता परिषद) दि.१४ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून १७ रुग्णांची नोंद झाली तर ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ६८३२  वर पोहोचली आहे. 

    काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम तालुक्यातील अडोळी येथील १, कळंबा महाली येथील १, रिसोड शहरातील एकता नगर येथील १, लोणी फाटा येथील २, उकीरखेड येथील १, पिंप्री सरहद येथील १, मानोरा शहरातील ३, धामणी येथील १, मोहगव्हाण येथील १, कारंजा शहरातील शिक्षक कॉलनी येथील २, हातोटीपुरा येथील १, भडशिवणी येथील १, मांडवा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ६८३२
  • ऍक्टिव्ह – ११८
  • डिस्चार्ज – ६५६१
  • मृत्यू – १५२

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.