Header Ads

राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्यात ७० हजार रिक्तपदांची उपलब्धी - state level online employment fair



70,000 vacancies in state level online employment fair

राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्यात ७० हजार रिक्तपदांची उपलब्धी

१२ व १३ डिसेंबर रोजी मेळाव्याचे आयोजन

नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

    वाशिम, दि. ०९ : १२ व १३ डिसेंबर २०२० रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात वाशिम जिल्ह्यासह राज्यातील विविध कंपन्यांमधील सुमारे ६५ ते ७० हजार रिक्त जागा भरण्याचे नियोजित आहे. त्या अनुषंगाने रोजगार इच्छुक उमेदवारांना www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार आज पासूनच सहभागी होता येणार आहे. 70,000 vacancies in state level online employment fair

    महारोजगार मेळाव्यात वाशिम जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातील इयत्ता चौथी उत्तीर्ण ते सर्वशाखीय डिप्लोमा, आय.टी.आय. तसेच पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असणाऱ्या रोजगार इच्छुक स्त्री, पुरुष उमेदवारांना त्यांच्याकडील एम्प्लॉयमेंट कार्डच्या युझरनेम व पासवर्डमधून मेळाव्यात सहभागी होता येईल. उमेदवारांना पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ उद्योजकांकडून एस.एम.एस., दूरध्वनी, ई-मेल किंवा सोयीच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येईल. त्यानुसार ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलखाती घेण्यात येणार आहेत.

    वाशिम जिल्ह्यातील रोजगार इच्छुक उमेदवारांसह राज्यातील इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी सुद्धा या महारोजगार मेळाव्यात ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन वाशिम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी केले आहे.

    महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे एम्प्लॉयमेंट कार्डमधील युझरनेम व पासवर्ड असावा. युझरनेम व पासवर्ड नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील ‘जॉब सिकर’ (Job Seeker) वरील ‘रजिस्टर’ पर्यायावरून युझरनेम व पासवर्ड मिळवावा. त्यानंतर जॉब सिकरच्या विंडोमध्ये लॉगीन करून डाव्या बाजूकडील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर वर क्लिक करावे. येथे वाशिम जिल्हा निवडून त्यातील ‘स्टेट लेव्हेल मेगा जॉब फेअर’ (State Level Mega Job Fair) मध्ये उपलब्ध पात्रतेनुसारच्या पदांवर अप्लाय करावे. त्यावेळी ‘अप्लायड’ (Applied) असा मेसेज दिसेल. याशिवाय विविध जिल्हा निवडणूक उपलब्ध पदांवर सुद्धा अप्लाय करता येईल. या पद्धतीने महारोजगार मेळाव्यात सहभागी होता येईल. अधिक माहितीकरिता वाशिम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या ०७२५२-२३१४९४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती बजाज यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.