Header Ads

तूर, चना अनुदान अप्राप्त असलेल्या शेतकऱ्यांना आवाहन - appeals to farmers for subsidy

 तूर, चना अनुदान अप्राप्त असलेल्या शेतकऱ्यांना आवाहन

    वाशिम, दि. ०९ : जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत तूर व चना खरेदी करण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. परंतु, काही शेतकऱ्यांना धान्य खरेदी करण्याबाबत एसएमएस मिळाले नव्हते. अशा शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदानाची रक्कम जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहे. ह्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे.

    काही शेतकऱ्यांचे बँक खाते बंद असल्याने, बँक खाते आधार लिंक नसल्याने किंवा मोबाईल नंबर चुकीचा दिल्यामुळे, इतर तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांशी संपर्क न झाल्याने अनुदान प्रलंबित आहे. तरी सदर शेतकऱ्यांनी १० डिसेंबर २०२० पर्यंत तालुका खरेदी केंद्रावर संपर्क करावा व आपले आधारकार्ड व बँक पासबुकची सत्यप्रत खरेदी केंद्रावर सादर करावी, असे अकोला जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.