Header Ads

MLC Amravati Division Teachers Constituency Election. मतदाराची ओळख पटविण्यासाठी पर्यायी ओळखपत्रांची यादी जाहीर

MLC Amravati Division Teachers Constituency Election 2020

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक

मतदाराची ओळख पटविण्यासाठी पर्यायी ओळखपत्रांची यादी जाहीर

वाशिम, दि. १८ (जिमाका) : विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ MLC Amravati Division Teachers Constituency Election 2020 द्वि वार्षिक निवडणूक २०२० करिता १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदान करतांना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रशिवाय ग्राह्य धरण्यात येणाऱ्या कागदपत्रांची यादी भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे.

ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र नाही, असे मतदार आधार आर्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, पारपत्र (पासपोर्ट), केंद्र अथवा राज्य शासन किंवा सार्वजनिक उपक्रम अथवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी औद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, मा. खासदार अथवा मा. आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, संबंधित शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, विश्वविद्यालायाद्वारे वितरीत पदवी किंवा पदविका मूळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र यापैकी कोणत्याही एका कागदपत्राद्वारे मतदान केंद्रावर आपली ओळख पटविण्यासाठी सोबत आणू शकतात, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.