Header Ads

MLC Amravati Teachers Constituency Election 2020 अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुक 2020

MLC Amravati Teachers Constituency Election 2020

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुक 2020

एका उमेदवाराने नामनिर्देशनपत्र घेतले मागे; २७ जण रिंगणात


अमरावती, दि. १७ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (MLC Amravati Teachers Constituency Election 2020 ) आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एका उमेदवाराने नामनिर्देशनपत्र मागे घेतले. त्यामुळे आता 28 पैकी 27 उमेदवार कायम आहेत.  सय्यद रिजवान सय्यद फिरोज यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला. उर्वरित 27 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात कायम आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी दिली. 

या निवडणुकीत एका उमेदवाराने नामनिर्देशनपत्र मागे घेतल्यानंतर अंतिमत: डॉ. नितीन रामदास धांडे (भारतीय जनता पक्ष), श्रीकांत गोविंद देशपांडे (शिवसेना), प्रा. अनिल मधुकरराव काळे (बळीराजा पार्टी), दिलीप आनंदराव निंभोरकर (लोकभारती), अभिजीत मुरलीधर देशमुख (अपक्ष), प्रा. अरविंद माणिकराव तट्टे (अपक्ष), अविनाश मधुकर बोर्डे (अपक्ष), आलम तन्वीर सैय्यद नियाज अली (अपक्ष), उपेंद्र बाबाराव पाटील (अपक्ष), प्रकाश बाबाराव काळपांडे (अपक्ष), सतीश माधवराव काळे (अपक्ष), किरण रामराव सरनाईक (अपक्ष), निलेश नारायण गावंडे (अपक्ष), महेश विष्णू डवरे (अपक्ष), दिपंकर सुर्यभान तेलगोटे (अपक्ष), प्रवीण उर्फ पांडुरंग नानाजी विधळे (अपक्ष), राजकुमार श्रीरामअप्पा बोनकिले (अपक्ष), चंद्रशेखर ऊर्फ शेखर मोहनराव भोयर (अपक्ष), डॉ. मुश्ताक अहेमद रहेमान शाह (अपक्ष), मोहंमद शकील अब्दुल अजीज कुरेशी (अपक्ष), प्रा. विनोद गुलाबराव मेश्राम (अपक्ष), शरदचंद्र कृष्णराव हिंगे (अपक्ष), श्रीकृष्ण बापूराव ठाकरे(अपक्ष), विकास भास्करराव सावरकर (अपक्ष), सुनील मोतीराम पवार (अपक्ष), संगीता सचिंद्र शिंदे-बोंडे (अपक्ष), संजय वासुदेव आसोले (अपक्ष)  हे 27 उमेदवार राहणार आहेत.

No comments

Powered by Blogger.