Header Ads

ऋणानुबंध जूळविण्यासाठी "लग्न अक्षदा" ची भरीव कामगिरी- Lagn Akshada Matrimony Application News

Lagn Akshada Matrimony Application

Lagn Akshada Matrimony Application

 ऋणानुबंध जूळविण्यासाठी "लग्न अक्षदा" ची भरीव कामगिरी

  • एका क्लिकवर पहायला मिळताहेत शेकडो स्थळे 
  • सामाजिक कार्यकर्त्यांनी केली मोफत ॲप्लिकेशनची निर्मिती

    वाशिम  दि.23 नोव्हेंबर - मानवी जीवनातील विविध संस्कारांपैकी विवाह हा एक अत्यंत पवित्र संस्कार आहे. संस्काराच्या निमित्ताने दोन मने, दोन कुटुंब, दोन गावे पिढ्यानपिढ्यांसाठी एकत्र येत असतात. तथापि, चांगले स्थळ मिळविण्याच्या शोधात प्रत्येक पालक असतो. आजघडीला स्थळे जुळवितांना पालकांची होणारी दमछाक पाहता काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन (Lagn Akshada Matrimony Application  ) "लग्न अक्षदा"  या ॲप्लिकेशनची निर्मिती केली असून यामाध्यमातून मोफत सेवा दिली जात आहे. अल्पावधीतच काही ऋणानुबंध जुळवण्याची किमया करून या ॲप्लीकेशनने भरीव कामगिरी केली आहे. नुकतेच लोणार येथील दुर्गा टेकडीवर या अँप्लिकेशनचे विमोचन करण्यात आले.

    धावपळीच्या व बदलत चाललेल्या समाजव्यवस्थेमध्ये ऋणानुबंध जुळवितांना येणाऱ्या अडचणी अनंत आहेत. आज-काल संवाद हरवत चालला आहे. प्रत्येकाची जगण्यासाठी धावपळ सुरू असते. अशावेळी उपवर मुला-मुलींचे विवाह जुळवितांना त्यांच्या पालकांना बऱ्याच अडचणी येतात. आमच्याकडे वर आहे, वधू आहे. एखादे सुयोग्य स्थळ सुचवा. असे शब्द त्यांच्याकडून  ऐकावयास मिळतात. योग्य स्थळ शोधण्यासाठी पालकांची बरीच दमछाक होते. एकंदर सर्व परिस्थिती असतांना तसेच यामध्ये बाजारू प्रवृत्ती शिरकाव करत असतांना स्थळे शोधण्यासाठी सामाजिक  जाणिवेतून आपण  काहीतरी केले पाहिजे. असा विचार करून रिसोड तालुक्यातील मोप येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार गजानन खंदारे तसेच वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथील सामाजिक कार्यकर्ते व सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांच्यासह त्यांच्या समविचारी कार्यकर्त्यांची बैठक झाली. आणि तंत्रज्ञानाचा उपयोग घेत हजारो स्थळे एका क्लिकवर  पाहता येतील या दृष्टीने "लग्न अक्षदा"  या ॲप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे.

    महिनाभरापूर्वीच या ॲप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. याला अल्पावधीतच  उदंड असा प्रतिसाद  मिळाला असून एक हजाराच्या वर लोकांनी याला डाऊनलोड केले आहे. तर वधू-वरांची सहाशेच्या वर स्थळे ॲप्लिकेशन मध्ये सहभागी झाली आहेत. तसेच या माध्यमातून काही विवाह  सुद्धा जुळून आले आहेत. व काही स्थळांची बोलणी सुरू आहे. विशेष म्हणजे या ॲप्लिकेशन मध्ये वधू-वरांची माहिती संपादित करण्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही. तसेच सुरक्षिततेचे मापदंड कटाक्षाने पाळले जात आहेत. सामाजिक जाण व भान ठेवून समाजकार्याच्या उदात्त हेतूने हे कार्य आम्ही करीत असल्याचे या अँप्लिकेशनचे मुख्य ऍडमिन  गजानन खंदारे यांनी सांगितले. यावेळी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, विवाह जुळवण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सध्या बाजारू प्रवृत्ती दाखल झाली आहे. अनेक लुटारू लोक यामध्ये कार्यरत झाले आहेत. हजारो रुपयांची मागणी करून लग्न जुळवून देण्याचे अमिष दाखवून पालकांकडून , वरांकडून  पैसे घेतले जात आहेत. यातून अनेकांची फसवणूक झाल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा एकूणच परिस्थितीत आपल्या गाव खेड्यातील, शहरातील पालकांना आपल्याच भागातील , नात्यागोत्यातील योग्य स्थळे आणि तेही विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही "लग्नअक्षदा"  ची निर्मिती केली आहे. सध्या सकल मराठा समाजातील स्थळे उपलब्ध करण्यात आली असली तरी भविष्यात इतर समाजांचाही यामध्ये समावेश केला जाणार असल्याची माहिती गजानन खंदारे यांनी दिली.

    "लग्न अक्षदा"  मध्ये वाशीम जिल्ह्याला सीमावर्ती जिल्हे असलेल्या  बुलढाणा व हिंगोली जिल्ह्यातील सकल मराठा समाजातील शेकडो स्थळे उपलब्ध झाली आहेत. तसेच राज्यातील इतर जिल्ह्याचाही समावेश यामध्ये करण्यात आला असून विविध जिल्ह्यातील शेकडो स्थळे सहभागी झाली आहेत. 

    या ॲप्लिकेशनच्या विमोचनाचा कार्यक्रम जगप्रसिध्द लोणार येथील प्रसिद्ध दुर्गा टेकडी येथे पार पडला. यावेळी दुर्गा टेकडीवर वास्तव्य करणारे निस्सीम वृक्षप्रेमी पूंडलिकराव मापारी यांच्यासह रिसोड येथील मराठा सेवा संघाचे पदाधिकारी विजय बोरकर, गजानन खंदारे, शिवशंकर कव्हर, पंडितराव देशमुख, पत्रकार प्रा.  राम धनगर, गजानन धामणे, ज्ञानेश्वर गवळी, भालचंद्र पाटील, दिपक तळणकर आदींची उपस्थिती होती.

    मोठमोठ्या शहरात विवाह जुळणाऱ्या संस्थांचे व्यावसायिक जाळे निर्माण होत असतांना  आपल्या मागास ग्रामीण व शहरी भागात सामाजिक जाणिवेतून विनामूल्य सुरू करण्यात आलेल्या Lagn Akshada "लग्न अक्षदा"  या ॲप्लिकेशनचा अनेकजण लाभ घेत आहेत. दररोज शेकडो जण या अँप्लीकेशनला भेट देत आहेत. आपणही या ॲप्लीकेशन ला भेट देऊन विवाहयोग्य मुला-मुलींच्या पालकांना याची माहिती द्यावी. असे आवाहन लग्न अक्षदा चे गजानन खंदारे यांनी दिली आहे.

No comments

Powered by Blogger.