Header Ads

MLC 'Amravati Teachers' Constituency election 2020 - उमेदवार, मतदान केंद्र प्रतिनिधींची होणार कोरोना चाचणी


MLC 'Amravati Teachers' Constituency election 2020

 अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक

उमेदवार, मतदान केंद्र प्रतिनिधींची होणार कोरोना चाचणी

जिल्हास्तरावर स्वतंत्र सुविधा कक्ष स्थापन

    वाशिम, दि. २३ (जिमाका) : विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ द्विवार्षिक निवडणूक २०२० (MLC 'Amravati Teachers' Constituency election 2020) करिता १ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रीये दरम्यान कोविड-१९ सुरक्षात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. या अंतर्गत सर्व उमेदवार आणि त्यांचे मतदान केंद्र प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधी यांची कोरोना चाचणी चाचणी करण्यात येणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या आदेशानुसार वाशिम येथील अनुसूचीत जाती मुलींचे वसतिगृह येथे स्वतंत्र सुविधा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

    अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रक्रीये दरम्यान कोविड-१९ सुरक्षात्मक व प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी उमेदवार, मतदान केंद्र प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी यांची कोविड-१९ चाचणी करण्यासाठी स्वतंत्र सुविधा कक्ष स्थापन करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हास्तरावर कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनिधी यांची यादी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांची कोरोना विषयक चाचणी या कक्षात केली जाणार आहे.

No comments

Powered by Blogger.