Free webinar on 'Skills Development Training Courses and Employment Opportunities in Plastics'- ‘प्लास्टिक क्षेत्रातील कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि रोजगार संधी’ विषयावर मोफत वेबीनार

free webinar image

‘प्लास्टिक क्षेत्रातील कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि रोजगार संधी’ विषयावर मोफत वेबीनार

    वाशिम, दि. २४ (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राच्यावतीने गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ४ ते ५ वा. दरम्यान Free webinar on 'Skills Development Training Courses and Employment Opportunities in Plastics' ‘प्लास्टिक क्षेत्रातील कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि रोजगार संधी’ विषयावर मोफत वेबीनार चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये औरंगाबाद येथील तांत्रिक अधिकारी श्रीमती मौसम चौधरी मार्गदर्शन करणार आहेत. तरी इच्छुक युवक, युवतींनी या वेबीनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी केले आहे.

    वेबीनारमध्ये सहभागी होवू इच्छिणाऱ्या युवक, युवतींनी https://meet.google.com/qvm-jcbj-odv या लिंकवर क्लिक करून या सत्रात सहभागी व्हावे. वेबीनारमध्ये सहभागी होण्यासाठी ‘गुगल मीट’ (google meet) अॅप डाऊनलोड करावे. या अॅपमधून कनेक्ट झाल्यानंतर ‘आस्क टू जॉईन’ (Ask to Join) वर क्लिक करावे. सत्रामध्ये सहभागी होण्यापूर्वी १० मिनिट अगोदर जॉईन करावे. कनेक्ट झाल्यानंतर लगेच आपला व्हिडीओ व माईक बंद (म्युट) करावा. सत्राच्या शेवटी काही प्रश्न असल्यास माईक सुरु करून प्रश्न मोजक्या शब्दात विचारावेत व पुन्हा लगेच माईक बंद करावा, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे.


Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३ वर्ष - ४४ दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२ Janta Parishad E-43 Y-44 24-11-2022

  साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३     वर्ष - ४४    दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२    Weekly Janta Parishad    Edition : 43      Year : 44     Date...