Header Ads

कोरोना संसर्ग रोखणे साठी जनतेने नियमांचे पालन करावे - कारंजाचे तहसीलदार धिरज मांजरे यांचे जनतेला आवाहन

कोरोना संसर्ग रोखणे साठी जनतेने नियमांचे पालन करावे 
कारंजाचे तहसीलदार धिरज मांजरे यांचे जनतेला आवाहन 

    कारंजा दि २३ -  गत काही दिवसांमध्ये कारंजा तालुक्यात कोरोना पॉजिटिव रुग्णांचे संख्येमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते आहे. यामुळे नागरिकांनी पुनश्च विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे कारंजाचे तहसीलदार धिरज मांजरे यांनी म्हटले आहे. 

    मुंबई, पुणे सारख्या महा नगरातून  प्रवास करुन आलेल्या व्यक्तींमध्ये कोरोना पॉजिटिव असण्याचे प्रमाण जास्त आढळून येत आहे. त्यामुळे अशा व्यक्ति आपल्या घरी अथवा गावी आलेले असल्यास त्यांनी त्यांची तातडीने तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. जेणेकरून वेळीच निदान होऊन त्यावर उपचार करणे सोयीचे होईल. तसेच आपल्या कुटुंबियांना, आजूबाजूच्या व्यक्तींना तसेच गावातील नागरिकांना होणाऱ्या संसर्गा पासून वाचविता येईल. तसेच ज्या व्यक्तींना कोरोना सदृश लक्षणे असतील त्यांनीही तपासणी करून घ्यावी.

    कारंजा शहर तसेच तालुक्यातील नागरिकांनी SMS  (1.Social Distancing 2.Mask 3.Sanitizer) ह्या त्रिसुत्रीचा अवलंब करावा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, घराबाहेर जातांना मास्क चा वापर करावा, वेळोवेळी हात धुणे, दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवून बोलणे ह्या खबरदारी घ्याव्यात. असे आवाहन तहसीलदार धिरज मांजरे यांनी केले आहे.  

No comments

Powered by Blogger.