Header Ads

Firecracker sellers should follow the rules - फटाके विक्रेत्यांनी नियमांचे पालन करावे


फटाके विक्रेत्यांनी नियमांचे पालन करावे
यंदा नागरिकांनी फटाके फोडणे टाळावे 
 जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवाहन 

वाशिम, दि. ०६ (जिमाका) : संयुक्त मुख्य विस्फोटक यांच्या निर्देशानुसार फटाक्यांच्या दुकानांचे शेड हे आग प्रतिबंधक व पूर्णतः बंद असणे आवश्यक असून शेडमध्ये कोणताही अनोळखी व्यक्ती प्रवेश करणार नाही, अशी व्यवस्था दुकानदारांनी करावी. फटाक्यांच्या दोन दुकानातील अंतर हे कमीत कमी तीन मिटर व प्रोटेक्ट वर्कपासून ५० मीटर अंतरावर असणे आवश्यक आहे. फटाक्यांच्या दुकानांची प्रवेशद्वारे, तोंडे एकमेकांकडे नसतील याची दक्षता घ्यावी. दुकानामधील लाईटची व्यवस्था दुकानांच्या भिंतीवर सुरक्षितपणे केलेली असावी.

फटाक्यांची डिजिटल अॅडोटाईसची फलके दुकानांच्या ५० मीटर अंतरावर असावीत. दुकानामधील लाईटची व्यवस्था दुकानांच्या भिंतीवर सुरक्षितपणे केलेली असावी. एका फटाक्याच्या दुकानामध्ये जास्तीत जास्त १०० किलोग्रॅम फायर वर्क्स तथा ५०० किलोग्रॅम चायनीज, क्रेकर, स्पार्कलर्स स्फोटके ठेवली जातील, याची दक्षता घ्यावी. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फटाका विक्रीची दुकाने खुल्या जागेमध्ये, पटांगणामध्ये असणे आवश्यक आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास कमीत कमी नुकसान होईल. तसेच सार्वजनिक ठिकाणी, निवासी इमारतीमध्ये, गर्दीच्या ठिकाणी फटाका विक्री आणि साठवणूक करण्यास मनाई करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार फटाक्यांच्या दुकानामध्ये केवळ ग्रीन फायर क्रेकर विकली जातील. नागरिकांनी दिवाळीच्या कालावधीमध्ये रात्री ८ ते १० वाजता दरम्यानच फटाके फोडावेत, असे आवाहनही वाशिमचे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी केले आहे. दीपावली उत्सवात मोठ्या प्रमावर फटाक्यांची आतिषबाजी झाल्यास वायू व ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढून जनसामन्यांच्या तसेच प्राणिमात्रांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतो. तसेच कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तींनाही फटाक्यांच्या धुरांमुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम होवून त्रास होण्याची भीती आहे. ही बाब विचारात घेवून नागरिकांनी यावर्षी फटाके फोडण्याचे टाळून त्याऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणावर करून उत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.