Header Ads

Scholarship to students taking online or campus education in foreign university - आता परदेशी विद्यापीठात ऑनलाईन किंवा कॅम्पस शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनाही मिळणार परदेश शिष्यवृत्तीचा लाभ

आता परदेशी विद्यापीठात ऑनलाईन किंवा कॅम्पस शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनाही मिळणार परदेश शिष्यवृत्तीचा लाभ

मुंबई, दि. ६ : जागतिक पातळीवर १ ते ३०० रँकिंगच्या विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीचा लाभ आता ऑनलाईन किंवा कॅम्पस पद्धतीने शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले आहे.

परदेश शिष्यवृत्तीच्या पात्र २१ विद्यार्थ्यांची दुसरी यादीही सामाजिक न्याय विभागामार्फत शासन आदेश निर्गमित करून जाहीर करण्यात आली आहे.

अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या 27 जून 2017 च्या सुधारित नियमावलीनुसार परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित शैक्षणिक संस्थेत पूर्ण वेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा अशी अट होती, कोविड-१९ च्या महामारीच्या जागतिक प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थी भारतात राहूनच ऑनलाइन शिक्षण घेत होते व असे विद्यार्थी संस्थेत पूर्णवेळ प्रवेशित नसल्याने शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित होते.

खास बाब म्हणून, अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाचे विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून कोविडचा प्रादूर्भाव संपुष्टात येईपर्यंत किंवा संबंधित विद्यापीठ प्रत्यक्षात सुरू होईपर्यंत भारतात राहून ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना एक विशेष बाब म्हणून विद्यापीठाची अनुज्ञेय फी मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय श्री . मुंडे यांनी घेतला आहे.

No comments

Powered by Blogger.