Header Ads

13 Oct Washim District News - रेस्टॉरंट, बार रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा - Restaurant, bar allowed to open until 10 p.m.

Restaurant, bar allowed to open until 10 p.m.

 रेस्टॉरंट, बार रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

वाशिम, दि. १३ (जिमाका) : जिल्ह्यात ५ ऑक्टोबर पासून हॉटेल, रेस्टॉरंट व बार ५० क्षमतेने सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना (एसओपी)चे काटेकोरपणे पालन करून सकाळी ११.३० ते रात्री १० वाजेपर्यंत रेस्टॉरंट व बार सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

‘मिशन बिगेन’च्या पाचव्या टप्प्यामध्ये ५ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट व बार ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास राज्य शासनाने मुभा दिली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने त्या संदर्भातील आदेश निर्गमित केले. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट व बारसाठी पर्यटन विभागाने ‘एसओपी’ तयार केली असून सदर ‘एसओपी’चे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

-----------------------------------------------------------------------------------

हे ही वाचा ........

वाशिम जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट व बारकरिता कार्यप्रणाली जाहीर

No comments

Powered by Blogger.