13 Oct Washim Corona News - जिल्ह्यात आणखी ३८ कोरोना बाधित

maze kutumb mazhi jababdari logo
Washim Corona News Today 38 Positive

दि. १३ ऑक्टो - वाशिम जिल्ह्यात आणखी ३८ कोरोना बाधित; ३० जणांना डिस्चार्ज

वाशिम (जनता परिषद) दि.१३ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम जिल्ह्यात ३८ व्यक्ती कोरोना बाधीत आले असून ३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ५०६९ पर्यंत पोहोचली आहे.

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील पंचशील नगर येथील १, अल्लाडा प्लॉट येथील १, लाखाळा येथील १, माधवनगर येथील १, जैन कॉलनी येथील १, सुंदरवाटिका येथील १, क्रांती चौक येथील १, शेलूफाटा येथील १, सावळी येथील १, जांभरुण नावजी येथील १, भटउमरा येथील १, कोंडाळा महाली येथील १, रिसोड शहरातील गजानन नगर येथील १, इतर ठिकाणचा १, सवड येथील २, मालेगाव शहरातील वार्ड क्र. एक मधील १, इतर ठिकाणचा १, शेलगाव बोन्दाडे येथील १, डव्हा येथील १, मंगरूळपीर शहरातील मंगलधाम येथील २, इतर ठिकाणचे ३, मोहरी येथील ३, बेलखेड येथील १, पिंप्री खडी येथील १, चिखली येथील १, पिंप्री सुर्वे येथील १, तऱ्हाळा येथील १, शेंदूरजना येथील २, मसोला येथील १, कारंजा लाड शहरातील नगरपरिषद कॉलनी परिसरातील १, खेर्डा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

आज ३० डिस्चार्ज 

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ३० व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या काही दिवसांत जिल्ह्याबाहेर उपचार घेत असलेल्या १३५ व्यक्तींना डिस्चार्ज मिळाला असून त्याची नोंद आज घेण्यात येत आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ५०६९
  • ऍक्टिव्ह – ५३८
  • डिस्चार्ज – ४४२५
  • मृत्यू – १०५
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)
Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३ वर्ष - ४४ दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२ Janta Parishad E-43 Y-44 24-11-2022

  साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३     वर्ष - ४४    दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२    Weekly Janta Parishad    Edition : 43      Year : 44     Date...